शिर्डीत एकाच दिवशी आत्महत्या आणि हत्या

By Admin | Updated: May 5, 2016 13:21 IST2016-05-05T13:21:17+5:302016-05-05T13:21:17+5:30

सर्वधर्म सदभाव व शांतीचा संदेश देणारी साईनगरी प्रेमीयुगूलाची आत्महत्या व निर्घृण हत्येने गुरुवारी हादरून गेली

Shirdi suits and murders on the same day | शिर्डीत एकाच दिवशी आत्महत्या आणि हत्या

शिर्डीत एकाच दिवशी आत्महत्या आणि हत्या

>ऑनलाइन लोकमत - 
शिर्डी, दि. 05 - सर्वधर्म सदभाव व शांतीचा संदेश देणारी साईनगरी प्रेमीयुगूलाची आत्महत्या व निर्घृण हत्येने गुरुवारी हादरून गेली. 
 
अवघा 21 वर्षाचा राहुल शेषराव तुपे (रा, रांजणगाव,शेनपुंजी, औरंगाबाद) व 38 वर्षाची कल्पना कवट (रा. वसई) या दोघांनी आज येथील हॉटेल श्रीकृष्णामध्ये फॅनला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. कल्पना गेल्या 2 तारखेपासून घरून बेपत्ता होती तर राहुल मालेगावमध्ये पॉलिटेकनिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी साडे नऊच्या सुमारास आत्महत्या केल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. सहायक पोलीस निरीक्षक राक्षे, दिलीप मंडलीक, मनोज सनानसे, सुभाष थोरात,भराट आदीनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली आहे.
 
दुस-या घटनेत पहाटे संस्थांनच्या द्वारावती इमारती समोरील बागे लगत असलेल्या मैदानात एका अज्ञात व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी छाती, डोक्यात जड वस्तूने मारहाण केल्याने जागेवरच मृत्यू झाला. या दोन्ही घटनेने शिर्डी हादरून गेली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shirdi suits and murders on the same day