शिर्डीत शंकराचार्यांच्या प्रतिनिधीला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 18:54 IST2016-07-12T18:54:42+5:302016-07-12T18:54:42+5:30

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे प्रतिनिधी दंडी स्वामी सरस्वती यांच्यावर आज शिर्डीत काळी शाई फेकुन संताप व्यक्त करण्यात आला.

In Shirdi, Shankaracharya's representative was arrested | शिर्डीत शंकराचार्यांच्या प्रतिनिधीला फासले काळे

शिर्डीत शंकराचार्यांच्या प्रतिनिधीला फासले काळे

ऑनलाइन लोकमत

शिर्डी, दि. 12 - साईबाबांच्या देवत्वाला आव्हान देणाऱ्या शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे प्रतिनिधी दंडी स्वामी सरस्वती यांच्यावर आज शिर्डीत काळी शाई फेकुन संताप व्यक्त करण्यात आला. आज दुपारी सव्वादोनच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात शिर्डीत दाखल झालेले दंडी स्वामी पाच वाजेपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयात बसून होते. तेथून पोलीस त्यांना बाहेर काढत असताना साईबाबांचा जयजयकार करत एका अज्ञात तरुणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकून संताप व्यक्त केला. साईबाबा देव नसुन त्यांची कोणी पुजा करू नये, या शंकराचार्य व दंडीस्वामीच्या भुमिकेमुळे साईभक्ताक्तांमध्ये नाराजीची भावना होती.
गेल्या २९ जून रोजी दक्षिणेतील रमणानंद स्वामींनी साईबाबांच्या देवत्वाच्या समर्थनार्थ शिर्डीत मेळाव्याचे आयोजन केले होते.याच बरोबर त्यांनी शंकराचार्यास या विषयावर वादविवादा साठी आव्हान दिले होते. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून रमणानंद स्वामींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्या बरोबर प्रशासनाने दंडी स्वामींना नोटीसा बजावुन शिर्डी महसूल क्षेत्रात येण्यापासून रोखले होते.
प्रशासनाच्या व संबधित अधिकाऱ्याच्या या निर्णया विरोधात दंडी स्वामींनी उच्च न्यायायलयाचे दरवाजे ठोठावले होते़ यावर न्यायालयाने दंडी स्वामींना शिर्डीत जाण्यास सशर्त परवानगी दिली होती़ साईबाबा मंदीरात जाणार नाही,माध्यमांशी बोलणार नाही व अशांतता निर्माण होईल असे कोणतेही कृत्य व वक्तव्य करणार नाही आदी अटींवर दंडी स्वामींना अठ्ठेचाळीस तासांसाठी शिर्डीत जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती़
त्यानुसार दंडी स्वामी आज दुपारी पोलीस संरक्षणात दुपारी सव्वा दोनच्या सुमारास प्रांत कार्यालयात आले होते़ यावेळी प्रांताधिकारी बाहेर गावी होते़ त्यामुळे स्वामींनी तहसिलदार सुभाष दळवी,पोलीस उपअधिक्षक विवेक पाटील आदी अधिकाऱ्याना आपणास शिर्डीत येण्यापासुन रोखल्याबद्दल जाब विचारला. यावेळी अनेक पोलीस अधिकाऱ्यासह परिसरात साध्या वेषातील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ दरम्यान पाचच्या सुमारास स्वामींनी पोलीस ठाण्यात जावुन बसण्याचा निर्णय घेतला़ यावेळी त्यांना बंदोबस्तात बाहेर काढत असतांनाच अचानक आलेल्या एका तरूणाने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली व साईबाबांचा जयजयकार करत तो दिसेनासा झाला़ पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ यानंतर दंडी स्वामी पोलीस संरक्षणात औरंगाबादकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले़ ते जात असतांना काही नागरीकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या

Web Title: In Shirdi, Shankaracharya's representative was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.