शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी संस्थानचा निधी कोणत्याही कामासाठी वापरण्यास कोर्टाची मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:58 IST

दैनंदिन खर्चास बंदी नाही; पैशांचा नियमबाह्य वापर झाल्यास विश्वस्तांना जबाबदार धरणार

औरंगाबाद : संस्थानचा दैनंदिन खर्च वगळता निळवंडे धरणासह इतर कोणत्याही कामासाठी शिर्डी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरूनये, असा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिला.शिर्डी संस्थानच्या निधीच्या अनुषंगाने दाखल याचिकांवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. खंडपीठाने यापूर्वी मागविलेली माहिती सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी केली असता खंडपीठाने ती मान्य करीत या याचिकांची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या तरतुदीनुसार आणि कुठल्या अटी व निकषांवर जाहीर केला, अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची कायदेशीर तरतूद आहे का, अशी विचारणा पुन्हा करुन संस्थानच्या निधीचा नियमबाह्यपणे वापर झाल्यास विश्वस्तांना जबाबदार धरू, असा इशारा खंडपीठाने दिला.स्वच्छता का नाहीसाईबाबांचे भक्त संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही दर्शनासाठी येतात. देशातील इतर धार्मिक स्थळांप्रमाणे शिर्डीत स्वच्छता का नाही, असाही सवाल न्यायालयाने केला.

टॅग्स :shirdiशिर्डीGovernmentसरकार