साईसमाधी शताब्दीसाठी शिर्डीत बैठक
By Admin | Updated: July 10, 2014 01:25 IST2014-07-10T01:25:43+5:302014-07-10T01:25:43+5:30
साईसमाधी शताब्दीच्या निमित्ताने विविध पायाभूत सुविधांचा सविस्तर आराखडा बनवण्यासाठी शासन पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत़

साईसमाधी शताब्दीसाठी शिर्डीत बैठक
शिर्डी : साईसमाधी शताब्दीच्या निमित्ताने विविध पायाभूत सुविधांचा सविस्तर आराखडा बनवण्यासाठी शासन पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत़ जिल्हाधिकारी अनिल कवडे गुरूवारी संबधित विभागाच्या अधिका:यांची शिर्डीत बैठक घेणार आहेत़साईबाबांच्या समाधीला 2क्17-18 मध्ये शंभर वर्षे होत आहेत़ जुलै 2क्15 मध्ये नाशिकचा कुंभमेळा होत आह़े गर्दीचे नियोजन व पायाभूत सुविधांच्या उभारणीकरितादहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री व अधिका:यांची समिती नियुक्त करण्यात आली होती़ मात्र त्यावर कोणतेही कामकाज झाले नव्हत़े राज्याचे मुख्य सचिव सहारिया यांच्या शिर्डी भेटीनंतर या विषयाला गती आली़ (प्रतिनिधी)