शिर्डीत मंगळसूत्र चोराला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By Admin | Updated: July 12, 2016 20:23 IST2016-07-12T20:23:53+5:302016-07-12T20:23:53+5:30
महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरणाऱ्या श्रीरामपुरच्या आरोपीस राहाता न्यायालयाने काल तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली

शिर्डीत मंगळसूत्र चोराला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
>वाशिम : स्वच्छ भारत मिशनच्या वाशिम जिल्हा कक्षाच्या वतीने १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘कॉफी विथ रनर्स’ या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणा-या सरपंच व ग्रामसेवकांशी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी संवाद साधला. ५ वाजता सुरू झालेला संवाद रात्री ७ वाजता थांबला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी स्वच्छ भारत
मिशनअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम करणारे सरपंच व ग्रामसेवकांसोबत कॉफी
घेत- घेत मनकोकळा संवाद साधला. स्वच्छ भारत मिशनचे उप मुख्य कार्यकारी
अधिकारी महेश पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा हगणदरीमुक्त
करण्याच्या हेतुने जिल्ह्यात नवनवे उपक्रम घेण्यात येत आहेत. या कामी
पुढाकार घेणाºया तसेच उत्कृष्ठ काम करून इतरांसमोर आदर्श निर्माण करणाºया सरपंच व ग्रामसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून ‘कॉफी विथ रनर्स’ हा उपक्रम जिल्हा परिषदेने सुरू केला. अशा लोकांना प्रेरित करण्यासाठी व त्यांना अन्य विकास कामातही सहकार्य करण्यासाठी, शौचालय बांधकामात पुढाकार घेणारे सरपंच, ग्रामसेवक आणि ‘व्हिलेज चँपिअन’ अशा एकूण १२ जणांना मंगळवारी कॉफीसाठी आमंत्रित करुन गणेश पाटील यांनी गावातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. विशेषत: गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी गावात काय
प्रयत्न चालु आहेत याची सविस्तर चर्चा करण्यात आली. एमआरईजीएस या
केंद्राच्या योजनेतील अडचणींसह घरकुल, अतिक्रमण, विहिर अशा वैयक्तिक लाभाच्या योजना व प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. दर महिन्याला एकदा हा उपक्रम घेण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश
पाटील यांनी सांगितले.