शिर्डीत एकात्मतेची अखंड धुनी!

By Admin | Updated: October 31, 2014 01:53 IST2014-10-31T01:53:37+5:302014-10-31T01:53:37+5:30

साईंनी त्यांच्या हयातीत द्वारकामाई मशिदीमध्ये धुनीच्या रूपाने पेटवलेली एकात्मतेची ज्योत आजही सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देत आह़े

Shirdi integration of unity! | शिर्डीत एकात्मतेची अखंड धुनी!

शिर्डीत एकात्मतेची अखंड धुनी!

राष्ट्रीय एकता दिवस : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त
प्रमोद आहेर - शिर्डी
साईंनी त्यांच्या हयातीत द्वारकामाई मशिदीमध्ये धुनीच्या रूपाने पेटवलेली एकात्मतेची ज्योत आजही सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देत आह़े यामुळेच साईंच्या शिर्डीची राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जगभर ओळख निर्माण झाली आह़े भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत असताना 
शिर्डीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. 
जवळपास दीडशे वर्षापूर्वी साईबाबांचे शिर्डीत आगमन झाल़े त्यांनी वास्तव्यासाठी येथील पडकी मशीद निवडली. मशिदीची साफसफाई करून त्यांनी तिला द्वारकामाई मशीद नाव दिल़े मशिदीत बाबा स्वहस्ते अन्न शिजवत व एकाच पंक्तीत सर्व जातीधर्माच्या भक्तांना खाऊ घालीत़ बडेबाबा रोज बाबांच्या बरोबर पंक्तीला असत़ बाबा मशिदीत राहून फकिराचा पेहराव घालत त्यामुळे मुस्लिमांना, तर मशिदीत धुनीच्या रूपाने अखंड अग्नी पेटवलेला असल्याने हिंदूंनाही ते आपले वाटत.  बाबा जसे गीतेमधील श्लोक सांगत तसे कुराणातील आयातचाही आधार घेत़ यामुळे हिंदू-मुस्लीम दोघांच्या दृष्टीनेही द्वारकामाई मशीद पवित्र ठिकाण बनल़े बाबांच्या भक्तांमध्ये हिंदू, मुस्लीम, पारशी, ािश्चन भाविक होते. निर्वाणापूर्वी साईबाबांनी 15 दिवस अगोदर वङो यांच्याकडून द्वारकामाईत रात्रंदिवस रामविजय ग्रंथाचे वाचन करून हिंदूंना निर्वाणाचा संदेश दिला होता़ तसाच औरंगाबादचे मुस्लीम संत बन्ने मिया यांनाही कासिम नावाच्या भाविकाकडे अडीचशे रुपये पाठवून कव्वाली व न्यास करण्यास सांगितले होत़े 
15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमी संपून एकादशी लागताच बाबांचे निर्वाण झाले. तेव्हा नव दिन नव तारीख म्हणजे त्या दिवशी मुस्लीम कॅलेंडरप्रमाणो 9 तारीख, मोहरमच्या नवव्या दिवशी बन्ने मियांना कळवलेल्या दिवशीच बाबांनी देह ठेवला़ त्या दिवशी बुद्ध जयंती होती तसा पूर्व भारतात दुर्गा उत्सवाचा समाप्ती दिन होता, असा दाखला मिळतो़ 
 

 

Web Title: Shirdi integration of unity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.