शिर्डी देवस्थान २०० किलो सोने सरकारी गोल्ड योजनेत गुंतवणार ?
By Admin | Updated: December 13, 2015 13:01 IST2015-12-13T12:45:30+5:302015-12-13T13:01:16+5:30
मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानाच्या पावलावर पाऊल टाकत शिर्डी देवस्थान २०० किलो सोने केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये गुंतवण्याचा विचार करत आहे.

शिर्डी देवस्थान २०० किलो सोने सरकारी गोल्ड योजनेत गुंतवणार ?
ऑनलाइन लोकमत
नगर, दि. १३ - मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानाच्या पावलावर पाऊल टाकत शिर्डी देवस्थान २०० किलो सोने केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये गुंतवण्याचा विचार करत आहे. शिर्डी साई बाबा देवस्थानाला २०० किलो सोने केंद्र सरकारच्या योजनेमध्ये गुंतवण्याची इच्छा आहे मात्र मुंबई उच्च न्यायालयाने देवस्थानाला भाविकांनी अर्पण केलेले सोने वितळवायला बंदी घातली आहे.
सध्या देवस्थानाचा कारभार पाहणा-या समितीची यातून मार्ग काढण्यासाठी पुढच्या आठवडयात बैठक होणार आहे. सोने वितळवण्यावरची बंदी उठवण्यासाठी समिती मुंबई उच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करु शकते. साईबाबांच्या मूर्तिवर १८० किलोचे सोन्याचे अलंकार असून, ते काढण्यात येणार नाहीत असे समितीने सांगितले.
शिर्डी देवस्थान देशातील पाच श्रीमंत देवस्थानांपैकी एक असून, देवस्थानकडे एकूण ३८० किलो सोने जमा आहे. त्यातील २०० किलो सोन्याची गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली तर, वर्षाला १.२५ कोटी रुपये देवस्थानाला व्याजरुपात मिळतील.