सेना-भाजपात कुरघोडीचे राजकारण

By Admin | Updated: July 25, 2014 01:05 IST2014-07-25T01:05:48+5:302014-07-25T01:05:48+5:30

सत्तेत भागीदारी असली तरी शिवसेना व भाजपा या मित्रपक्षांमधील अंतर्गत कुरबुरी चव्हाटय़ावर येण्यास सुरुवात झाली

Shirajadi politics of army-BJP | सेना-भाजपात कुरघोडीचे राजकारण

सेना-भाजपात कुरघोडीचे राजकारण

मुंबई : सत्तेत भागीदारी असली तरी शिवसेना व भाजपा या मित्रपक्षांमधील अंतर्गत कुरबुरी चव्हाटय़ावर येण्यास सुरुवात झाली आह़े शिवसेनेचे स्थानिक आमदार व नगरसेवक आपण केलेल्या कामांवर कुरघोडी करीत असल्याचा आरोप भाजपा नगरसेविकेने आज केला़    आपल्या व्यथा मांडताना त्या चक्क आर मध्य/ आर उत्तर प्रभाग समितीच्या बैठकीतच ढसाढसा रडल्या़ त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उभय पक्षांमधील श्रेयाचे राजकारण रंगात आले आह़े
भाजपाच्या स्थानिक नगरसेविका मनीषा चौधरी यांच्या मागणीनुसार बोरीवली पश्चिम येथील देवीदास रोड, देवकीनगर रोड आणि आय़सी़ कॉलनी अशा तीन रस्त्यांचा संगम असलेल्या वाय आकाराच्या चौकास प्रमोद महाजन यांचे नाव देण्यात आले होत़े मात्र याच चौकास शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी एक्सर गाव चौक असे नाव देण्याची मागणी आर मध्य/आर उत्तर प्रभाग समितीकडे केली आह़े
यावर चौधरी यांनी आज प्रभाग समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे कडाडून विरोध केला़ मुंबईतील गरीब व विधवा महिलांना स्वयंरोजगारासाठी 23 ठिकाणी मोफत शिलाई मशिन देण्याचे काम आपण केल़े मात्र याचे श्रेय सेनेच्या स्थानिक नगरसेवकाला दिले जात आह़े  तसेच एकाच चौकाला दोन नावे देण्याची प्रथा नाही़ पण केवळ आपल्याला त्रस देण्यासाठीच हा प्रकार सुरू असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आह़े मात्र हा आरोप घोसाळकर यांनी फेटाळून लावला आह़े (प्रतिनिधी)
 
बैठक तहकूब
श्रेयाच्या राजकारणावरून मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आज आर मध्य/आर उत्तर प्रभाग समितीमध्ये दिसून आल़ेप्रभाग समितीमध्ये चौधरी यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतर घोसाळकर यांच्या निषेधार्थ सभा तहकूब करण्यात आली़
 
न्याय कधी?
दहिसर येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार  नाहक त्रस देत असल्याची तक्रार शिवसेना नगरसेविका डॉ़ शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि भाजपा नगरसेविका मनीषा चौधरी यांनी केली होती़ प्रकरण पोलीस ठाण्यार्पयत गेल्यामुळे संबंधित आमदारावर कारवाईचे 
आश्वासन शिवसेना पक्षश्रेष्ठींनी दिले होत़े परंत अद्याप या नगरसेविका न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़
 
आमदारांचा पलटवार 
वाय चौकाला प्रमोद महाजन यांचे नाव दिल्याचे आपल्यास माहीत नव्हत़े  त्यासाठी भाजपा नगरसेविकेने कांगावा करण्याची गरज नव्हती, अशी नाराजी शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केली. परंतु हा मुद्दा चौधरी यांनी खोडून काढत घोसाळकर यांना चौकाच्या नामकरणाकरिता निमंत्रित केले होते, असे निदर्शनास आणून दिल़े

 

Web Title: Shirajadi politics of army-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.