शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
3
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
4
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
5
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
6
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
7
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
9
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
10
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
11
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
12
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
13
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक
14
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
15
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
16
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
17
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
18
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल

चमकोंची हौस पुरी; पण ‘विच्छा’ मात्र अपुरी !

By admin | Published: February 08, 2015 11:27 PM

यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत

राजीव मुळ्ये, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी : ‘यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे,’ हे वाक्य वारंवार म्हणतो तो निवेदक (नव्हे अँकर), लोक आपली कला नव्हे, तर आपल्याला पाहायला आलेत, याचं पक्कं भान ज्यांना आहे ते कलावंत (नव्हे सेलिब्रिटी) आणि या दोहोंची गोळाबेरीज म्हणजे ‘इव्हेंट’! या रूढ व्याख्यांचा जेव्हा अस्सल कलेला तडाखा बसतो, तेव्हा ‘हौस’ पुरी होते; पण ‘विच्छा’ अपुरीच राहते!नाट्य संमेलनाच्या मुख्य मंडपात शनिवारी रात्री असाच प्रकार पाहायला मिळाला. ‘इव्हेंट’ नावाचा सेलिब्रिटींचा उत्सव वाढता वाढे या न्यायाने लांबतच राहिला आणि त्यानंतर सुरू झालेला ‘विच्छा माझी पुरी करा’ या भन्नाट वगनाट्याचा रंगत चाललेला प्रयोग वेळ संपल्याने मध्येच थांबवावा लागला. अचूक ‘टायमिंग’ हे बलस्थान असलेले अभिनेते विजय कदम यांना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ‘टायमिंग’चा फटका सहन करावा लागला. ‘विच्छा’चा प्रयोग अपूर्ण राहिल्यामुळं अस्सल नाट्यप्रेमी हळहळतच मंडपाबाहेर पडले.केवळ ‘एक्साइटमेंट’ देणाऱ्या ‘इव्हेंट’ या प्रकाराची क्रेझ आता केवळ मुंबईपुरती नव्हे, तर लहान-मोठ्या शहरांतही पसरली आहे. बेळगावकरांनाही या ‘क्रेझ’नं झपाटलं असणारच, असा होरा ठेवून ‘ज्येष्ठ सेलिब्रिटीं’ची एक रजनी शनिवारी झाली होती. मुख्यमंत्री सकाळी न येता संध्याकाळी आल्यामुळं ही रजनी सुरू व्हायला उशीर झाला. त्यानंतर ‘विच्छा’चा प्रयोग होता. सर्वोच्च न्यायालयाने वेळेसंदर्भात घातलेले निर्बंध आयोजकांना माहीतच नाहीत, हे शक्य नाही. त्यामुळं ‘इव्हेंट’ची हौस आवरती घेऊन रंगमंच विजय कदमांच्या हाती सोपवला जाणं आवश्यक होतं. मात्र, घडलं भलतंच!तरुण सेलिब्रिटींनी तर बेळगाव संमेलनाकडे पाठ फिरवलीच आहे; त्यामुळं जे सेलिब्रिटी हजर आहेत, त्यांनाच आग्रह करकरून गाणं म्हणायला भाग पाडण्यात आलं. पाच-सहा कलावंतांचा आॅर्केस्ट्रा दिमतीला होताच. ज्यांना गाणं अजिबातच येत नाही, त्यांनी कविता वगैरे (अर्थातच दुसऱ्यांनी लिहिलेल्या) म्हणून दाखवल्या. ज्यांना ‘स्केल’ सांभाळता येत नाही अशांनी गाणी म्हटली. कोणे एकेकाळी नृत्यांगना असलेल्यांनी नृत्यं सादर केली. मधून-मधून पातळ विनोदांची फोडणी दिली गेली. उत्सुकता ताणण्याचा अभिनय करणाऱ्या स्त्री-पुरुष निवेदकांनी बोलून-बोलून काव आणला. पुन्हा प्रत्येक परफॉर्मरचा सत्कार! तोही एखाद्या सेलिब्रिटीच्या हस्ते! म्हणजे, ‘आता मी स्टेजवर आमंत्रित करतो....’ हे वाक्यही पुन:पुन्हा ऐकायचं. सेलिब्रिटींचं ‘दर्शन’ घ्यायचं आणि (अँकरनं सांगितल्यावर) टाळ्या वाजवायच्या, एवढंच रसिकांच्या हाती उरलं. कारकिर्दीचा विशिष्ट मुक्काम गाठलेल्या सेलिब्रिटींनीच सादरीकरण केलं, ही बाब दखल घेण्याजोगी आहे. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी सादर केलेला ‘एकच प्याला’मधला सुंदर प्रवेश हीच या रजनीची एकमेव उजवी बाजू ठरली. त्यानंतर वगसम्राट विजय कदम यांच्याकडे रंगमंचाचा ताबा आला. ढोलकीच्या भन्नाट तुकड्याने वातावरण गरम केलं. फक्कड बतावणीतून गोष्ट सुरू झाली. प्रधान, कोतवाल, हवालदार, त्याची प्रेयसी अशी सगळीच पात्रं जीव ओतून नाटकात रंग भरू लागली... आणि... अचानक विजय कदम हात जोडून उभे राहिले. ‘न्यायालयाच्या आदेशानुसार इथंच थांबावं लागतंय. माफ करा,’ असं ते म्हणाले व सन्नाटा पसरला.