शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 09:07 IST

कशाला पर्वा उकाड्याची, निभावू जबाबदारी मतदानाची

दीपक भातुसे

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी १३ मतदारसंघांत मतदान होत आहे. या १३ पैकी ६ लोकसभा मतदारसंघांत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना यांचे उमेदवार एकमेकांसमोर लढत आहेत. ३ मतदारसंघांत भाजप विरुद्ध काँग्रेस, २ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट आणि २ मतदारसंघांत भाजप विरुद्ध उद्धवसेना असा मुकाबला होणार आहे. 

शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीकडून १३ पैकी सर्वाधिक ८ मतदारसंघांत उद्धवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत, तर काँग्रेसचे ३ आणि शरद पवार गटाचे २ उमेदवार रिंगणात आहेत.  महायुतीकडून भाजपचे सर्वाधिक ७, तर शिंदेसेनेचे ६ उमेदवार लढत आहेत. अजित पवार गटाचा एकही उमेदवार या शेवटच्या टप्प्यात निवडणूक रिंगणात नाही.

४१,८९७ - बॅलेट युनिट२४,५७९ - कंट्रोल युनिट २४,५७९ - व्हीव्हीपॅट

१६० - मतदान केंद्रे राज्यामध्ये संवेदनशील.१०० - मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी१२ - पुरावे मतदार ओळखपत्रा-शिवाय मतदानासाठी ग्राह्य

काय आहे पक्षीय बलाबल? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर झालेल्या पक्षफुटीचे चित्र पाहिले तर या १३ मतदारसंघांपैकी ३ (मुंबई दक्षिण, ठाणे, पालघर) मतदारसंघातील खासदार उद्धवसेनेकडे आहेत, तर ४ (मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण, नाशिक) मतदारसंघातील खासदार शिंदेसेनेबरोबर आहेत. - मागील निवडणुकीत १३ पैकी भाजपने ६ (मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, भिवंडी, दिंडोरी, धुळे) जागा जिंकल्या होत्या.- शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना लढत - ६ मतदारसंघनाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण  - भाजप विरुद्ध काँग्रेस लढत - ३ मतदारसंघधुळे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-मध्य  - भाजप विरुद्ध शरद पवार गट लढत - २ मतदारसंघदिंडोरी, भिवंडी  - भाजप विरुद्ध उद्धव सेना - २ मतदारसंघपालघर, मुंबई उत्तर पूर्व

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना