शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
4
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
5
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
6
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
7
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
8
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
9
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
10
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
11
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
12
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
13
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
14
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
15
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
16
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
17
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
18
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
19
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
20
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत

By यदू जोशी | Updated: July 12, 2025 05:59 IST

आमदाराने केलेली मारहाण, प्राप्तिकराचा घोळ, मंत्र्याचा व्हिडीओ यामुळे कोंडी करण्यासाठी आयते मुद्दे हाती

यदु जोशीमुंबई : सत्तारुढ महायुतीतील घटक पक्ष असलेली शिंदेसेना गेले काही दिवस वादांच्या रडारवर असून या पक्षाचे मंत्री, आमदारांबाबत घडलेल्या घटनांनी शिंदेसेना आणि सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाल्याचे चित्र आहे. 

राज्यात महायुतीचे भक्कम बहुमताचे सरकार असताना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या प्रकरणांमुळे सरकारची कोंडी करण्यासाठीचे आयते मुद्दे विरोधकांना मिळाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. 

त्यातच खा. श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याचे विधान त्यांच्याच पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केल्याने या दोन गोष्टींना जोडून विरोधकांनी आणि विशेषत: उद्धव सेनेच्या नेत्यांनी टीकेची झोड उठविली. महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना या दोन पक्षांमध्ये आलबेल आहे की नाही अशी चर्चाही या निमित्ताने सुरू झाली आहे. शिंदे हे अमित शाह यांना भेटल्याच्या बातम्या आल्या नंतर अशी भेट झालीच नसल्याचा दावा शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी २४ तासानंतर केला.

नोटीस मिळाली की नाही?सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना खा.श्रीकांत शिंदे यांना आणि स्वत:लाही प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याचे सांगितले पण काहीच मिनिटांत ते पुन्हा माध्यमांसमोर आले आणि शिंदे यांना नोटीस मिळाल्याची आपल्याला माहिती नाही, असे ते म्हणाले.  ‘आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही’ असा खुलासा खा.शिंदे यांना एक्सवर करावा लागला.

हॉटेलचे टेंडर प्रकरणसंजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल वेदांतच्या टेंडर प्रक्रियेत नियम डावलून सहभाग घेतल्याच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत गोंधळ झाला.  तेव्हा या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने शिंदेसेनेचे मंत्री असलेले शिरसाट पुन्हा चर्चेत आले. 

संजय गायकवाड यांची गुंडागर्दीबुलडाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेली मारहाण महायुती सरकारसाठी अडचणीचा विषय ठरली. एखाद्या आमदाराने अशा पद्धतीने कायदा हाती घेण्यावर टीकेची झोड उठली. गायकवाड यांनी या मारहाणीचे समर्थन केल्याने ते सोशल मीडियात प्रचंड ट्राेल झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Gaikwadसंजय गायकवाडBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस