शिंदे म्हणतात, मला काही माहीत नाही!

By Admin | Updated: June 21, 2014 01:40 IST2014-06-21T01:40:54+5:302014-06-21T01:40:54+5:30

कोणीही अद्याप माङयाकडे विचारणा केलेली नाही’, असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नेतृत्व बदलाच्या प्रश्नाला खुबीने बगल दिली.

Shinde says, I do not know anything! | शिंदे म्हणतात, मला काही माहीत नाही!

शिंदे म्हणतात, मला काही माहीत नाही!

>सोलापूर :   ‘मला काहीही माहीत नाही, मीदेखील तुमच्यासारखंच पेपरमध्ये बातम्या वाचतो, कोणीही अद्याप माङयाकडे विचारणा केलेली नाही’, असे सांगत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नेतृत्व बदलाच्या प्रश्नाला खुबीने बगल दिली. 
  सिद्धेश्वर एक्स्प्रेसने शिंदे यांचे आज सकाळी सहकुटुंब सोलापुरात आगमन झाले. ‘जनवात्सल्य’ या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी त्यांना याविषयी छेडले असता ते म्हणाले, मी लंडनमध्ये डोळ्यावर उपचार करण्यासाठी गेलो होतो. राज्यात काय चाललंय मला माहीत नाही. राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा मी ही तुमच्याप्रमाणो पेपरमधून वाचल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी माङयाशी अद्याप कसलाही संपर्क साधलेला नाही. नेतृत्व बदलाचा विषय पुढे आला की माङो नाव जोडले जाते, हा नेहमीचाच प्रकार आहे. यात नवीन काय? असा प्रतिप्रश्न करीत शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना खुबीने टाळले (प्रतिनिधी)

Web Title: Shinde says, I do not know anything!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.