शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 14:10 IST

मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानतंर शिंदे गटाने नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षातील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नसली तर मुख्यमंत्रीपदाबाबत  पक्षांमध्ये रस्सीखेंच सुरु झाली आहे. मात्र भाजप नेते आणि  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचे चेहरे असल्याचे म्हटलं आहे. महाजन यांनी केलेल्या या दाव्यावर आता शिवसेना शिंदे गटानेही भाष्य केलं आहे. आमच्या मनात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार विधाने केली जात आहेत. कुठे कोणी आपल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याच्या चर्चा करत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्री असतील, असे विधान केले आहे. पहिल्यांदाच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री पदाबाबत असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. महाजन यांच्या या विधानावर आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया देत महत्त्वाचे वक्तव्य केलं.

"भाजपामध्ये एकच चेहरा आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजपाचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजीच होतील. पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपाचा असेल तर देवेंद्रजी आहेत," असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.

सगळं निवडणुकीच्या नंतर ठरेल - संजय शिरसाट

"गिरीश महाजन यांच्या मनात देवेंद्र फडणवीस आहेत तर माझ्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहेत. हे सर्व आमच्या मनात आहेत. पण या सगळ्याचा निर्णय वरिष्ठ मिळून घेतील. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यावर आम्ही वाद घालणार नाही. पण मनात असणे आणि प्रत्यक्षात येणं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल," असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

 दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. यापूर्वी ते २०१४ ते २०१९ या पाच  वर्षांच्या काळात ते मुख्यमंत्री होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटGirish Mahajanगिरीश महाजन