शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

"मूर्ख माणसावर काय बोलणार? निवडणूक आली की हे..."; निशिकांत दुबेंवर शिंदे गटाचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:33 IST

निशिकांत दुबेंच्या विधानावर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली.

Pratap Sarnaik On Nishikant Dubey: झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. उत्तरेत या तुम्हाला उचलून आपटतील, असं विधान निशिकांत दुबे यांनी केलं. दुबेंच्या या विधानावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार टीका केली. निशिकांत दुबेंच्या या विधानावर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली. हे लोक निवडणूक आली की अशाप्रकारे विधानं करतात, अशी प्रतिक्रिया मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो अशा प्रकारची विधाने केली. "देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राचे योगदान काय, असा सवाल उपस्थित केला. महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स असेल. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता?" अशा शब्दात निशिकांत दुबेंनी गरळ ओकली. तसेच "उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे फक्त उत्तर भारतीयांना लक्ष्य करत आहेत. तुम्हाला मारायचे असेल तर मग मुंबईतील तामिळी, तेलुगू आणि उर्दू सगळ्या भाषिकांना मारा. आम्ही मराठीचा सन्मान करतो; पण ही हुकूमशाही खपवून घेणार नाही," असंही दुबे यांनी म्हटलं. 

"निशिकांत दुबे यांनी केलेल्या विधानावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी अशा लोकांवर बोलण्याची गरज नसल्याचे म्हटलं.  निशिकांत दुबेंसारख्या मूर्ख आणि उल्लू माणसावर काय बोलणार? हे लोक उत्तर प्रदेश बिहारची निवडणूक आली की अशाप्रकारे विधानं करतात, अशा लोकांवर बोलायाची काहीही गरज नाही, या लोकांबद्दल बोलायची माजी इच्छाही नाही," असं प्रताप सरनाईक म्हणाले. "महाराष्ट्र, मराठीच्या पराक्रमाची साक्ष जगभर आहे. त्यांनी मराठी माणसाच्या कर्तृत्वावर, कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. कुणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगू शकत नाही. मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसावर अन्याय होऊ नये या सरकारच्या भूमिका आहेत. देशाच्या विकासदरात मराठी माणसाचे योगदान काय आहे हे माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती पाठवू," अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकhindiहिंदीMaharashtraमहाराष्ट्र