शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सरकारची शक्तिपरीक्षा सोमवारी; विशेष अधिवेशन लांबणीवर पाडण्याचे शिवसेनेचे प्रयत्न अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 09:04 IST

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली होती. त्यानंतर २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नव्या सरकारची शक्तिपरीक्षा ४ जुलै रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने  होणार आहे. तत्पूर्वी ३ जुलैला विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. दरम्यान, शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर करत हे अधिवेशन लांबणीवर पाडण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी धक्का बसला.

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ गुरुवारी सायंकाळी घेतली होती. त्यानंतर २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तथापि, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपने ॲड. राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे. २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपने धक्का दिला आणि त्याच रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सुरत गाठले. त्या नंतर हे आमदार गुवाहाटीला रवाना झाले. 

सध्या ते गोव्यात मुक्कामी आहेत. भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेवून महाविकास आघाडी सरकार पाडले. आता नव्या सरकारची शक्तिपरीक्षा घेणाऱ्या रविवारपासूनच्या अधिवेशनात भाजप आणखी धक्का देवू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

भाजपकडे अधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, त्यांच्या या त्यागाचा भाजपला अभिमान आहे असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्र परिषदेत सांगितले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत -एका तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचे ते सांगत आहेत; पण जे झाले ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सांगितले. अमित शहांनी दिलेला शब्द पाळला असता तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाठीत वार करून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला वरून तो शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण केला जात आहे, असा हल्लाबोलही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. 

आमच्यासोबत १७० आमदार : आपल्या सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. माझ्यासोबत ५० आमदार (शिवसेना व अपक्ष) आहेत आणि भाजपचे संख्याबळ आता १२० आहे.     - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री  

शिवसेना नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटविले  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून हटविण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतला. पण पक्षविरोधी कारवाया करीत आहात आणि शिवसेनेचे सदस्यत्व स्वतःहून सोडले आहे त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने मी आपणास नेते पदावरून हटवित आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

कार्यक्रम जाहीर -विधानमंडळ सचिवालयाने दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर  केला आहे. त्यानुसार रविवारी ३ जुलै रोजी  सकाळी ११ ला सभागृहाचे कामकाज सुरू होईल. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मतास टाकण्यात येईल.  विधान परिषदेत जशी सभापतींची निवड होते त्या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. प्रत्येक उमेदवारासाठी प्रस्ताव दिलेले असतात ते प्रस्ताव विषय पत्रिकेवर दाखवले जातील व प्रत्येक प्रस्ताव पुकारला जाऊन आवाजी तसेच नियमानुसार उभे राहून मतविभागणी केली जाईल. ज्या उमेदवाराचा प्रस्ताव बहुमताने मंजूर होईल ते अध्यक्ष नियुक्त होतील. तर सोमवारी विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने बहुमताचा ठराव मंजूर करण्यात येईल. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे