शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद आता ‘धाराशिव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 05:09 IST

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने २९ जून रोजी संभाजीनगर आणि धाराशिव, असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते, असे कारण देत आज नव्याने निर्णय घेताना ‘संभाजीनगर’ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करण्यात आला. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय कोर्टात टिकू शकणार नाहीत, असा युक्तिवाद नव्या सरकारमधील नेतृत्वाकडून करण्यात आला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत ही माहिती दिली. विधिमंडळात हा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल. 

प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून करण्यात येईल. 

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आपण नगरविकास मंत्री असताना दिलेला होता. पण स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनेचा आदर करून दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय शनिवारी घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतीय या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी आग्रहाची मागणी त्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत होती.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस