शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 13:22 IST

एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

नाशिक  - चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. २०२४ ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव येईल वाटत नाही. संविधान, घटना आणि कायदा याचे उल्लंघन करणारे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही असा दावा शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, १६ आमदार अपात्र ठरतील. केवळ वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आहे. सरकार व्हेटिंलेटरवर असून ते सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम होईल. कुणी त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना सामोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय. अधिवेशन काळात सरकारचा जो गोंधळ होता तो जवळून पाहता आला. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं. या राज्यात सरकार अस्तित्वात नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत अनेक प्रकरण अधिवेशन काळात समोर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे जणू काही घडलेच नाही आणि विरोधी पक्षच जबाबदार आहे अशा पद्धतीने काम करते. पूर्वी हायकोर्टाने ताशेरे मारले तरी मंत्री राजीनामा द्यायचे. पण एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे. ४० आमदारांसाठी हे सरकार आहे असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. 

शिवसेना एकच, गट-तट तात्पुरतेदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना. शिवसेना एकच आहे. गट-तट हे तात्पुरते आहे. शिवसेना एकच आहे. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्याचे बीज बाळासाहेबांनी रोवले. महावृक्ष फोफावतो, वाढतो. पाचोळा पडतो. कचरा पडतो तो कचरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वेचून नेला जातोय. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. कचरा आग लावण्यासाठी असतो. या कचऱ्याचा धूर फार काळ राहत नाही असंही संजय राऊतांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस