शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 18:40 IST

'पोलीस भरतीसंदर्भात 8 हजारांची अॅड आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकरच निघेल.'-देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सायबर सेक्युरिटी, तुरुंगातील कैद्यांची अवस्था यावर भाष्य केले. तसेच, वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांनाही टोला लगावला. यासोबतच, पोलीस विभागातील भरतीबाबत मोठी माहिती दिली. राज्यात 20 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

20 हजार पोलिसांची भरतीमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच राज्यात 20 हजार रिक्त पोलिसांची भरती होईल. 8 हजारांची एक जाहिरात आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकर काढू. या भरतीमुळे पोलिस विभागावरील मोठा ताण कमी होईल,' असे फडणवीस म्हणाले. 

कैद्यांसाठी खास सुविधायावेळी त्यांनी तुरुंगातील कैद्यांबाबतही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, 'राज्यातील तुरुंग विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या तुरुंगात 1641 असे कैदी आहेत, ज्यांची बेल झाली आहे, पण बेलबाँड करण्यासाठी त्यांच्याकडे व्यक्ती किंवा पैसे नसल्यामुळे ते तुरुंगातच आहे. अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही काही एनजीओची मदत घेणार आहोत,' अशी माहिती त्यांनी दिली. 

सायबर सेक्युरिटीबाबत निर्णय

तसेच, 'राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशींगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करत असून, लवकरच राज्यात सायबर सेक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत. तसेच, जागरुकतेसाठी एक कँपेनदेखील हाती घेत आहोत,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस