शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 15:27 IST

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Shivsena MLA Sanjay Gaikwad Controversial Statement: शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसाविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. मात्र आता पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतल्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांची माफी मागितली आहे. माझा हेतू पोलिसांचे धैर्य खचवण्याचा नव्हता असे संजय गायकवाड यांनी म्हटलं.

आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसां इतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि भारत सोडून जगात कुठेच नाही असं म्हणत गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची दखल घेत एकनाथ शिंदे यांना कडक समज द्यायला सांगितले. त्यानंतर आता संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

"माझं वक्तव्य महाराष्ट्रातल्या संपूर्ण पोलिसांचे धैर्य खचवणे, त्यांच्या धाडसाचा आणि पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हते. जे अनुभव मला आले होते ते मी त्या ठिकाणी मांडले. माझ्या शब्दामुळे महाराष्ट्रातल्या पोलिसांची किंवा महाराष्ट्र सरकारची नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. पण मी जे काही वक्तव्य केलं ते अनुभवले आहे. माझ्या परिवारासोबत तसे झाले आहे. त्यामुळे मी तसे बोललो होतो," असे संजय गायकवाड म्हणाले. मात्र मी स्थानिक पोलिसांवर ताशेरे ओढले होते आणि त्याबाबत मी ठाम आहे, असेही संजय गयकवाड यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते संजय गायकवाड?

"पोलिसांच्या इतके अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्र आणि भारत सोडून जगात कुठेच नाही. सरकारने गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, एखादा कठोर कायदा केला की एक हप्ता वाढतो. पोलिसांनी एखाद्या कारवाईत ५० लाख पकडले की ५० हजार दाखवतात. पोलिसांनी इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते," असं विधान गायकवाड यांनी केले होते.

मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

"उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. आमदार गायकवाड यांना कडक समज देण्यास सांगणार आहे. वारंवार असे चालणार नाही. हे योग्य नाही. मात्र, त्यानंतरही ते बोलतच असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल," असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.  

टॅग्स :Sanjay Gaikwadसंजय गायकवाडEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस