शिंदे-अजितदादांकडून शेतकरी देशोधडीला

By Admin | Updated: October 10, 2014 22:58 IST2014-10-10T22:36:43+5:302014-10-10T22:58:46+5:30

शालिनीताई पाटील : कोरेगावच्या जनतेचे वाटोळे करणाऱ्यांना हद्दपार करा

Shinde-Ajitadad farmers' farmer Desododadala | शिंदे-अजितदादांकडून शेतकरी देशोधडीला

शिंदे-अजितदादांकडून शेतकरी देशोधडीला

सातारा : ‘कोरेगाव, खटाव तालुक्यांतील २७ हजार सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना होता. मात्र, अजित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातून कर्ज थकल्याचे निमित्त केले. आणि जरंडेश्वर कारखान्याची लिलावाद्वारे विक्री करून अजित पवार यांनी कारखाना खरेदी करून आपल्या मालकीचा केला. कारखाना खरेदी करण्यामध्ये अजित पवार यांना आ. शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना हिसका दाखवून काँग्रेसचे उमेदवार विजय कणसे यांच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन डॉ. शालिनीताई पाटील यांनी केले आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कार्यकत्याची गोपनीय बैठक कोरेगाव येथे झाली. यानंतर शालिनीताई पाटील यांनी सांगितले की, १८ वर्षे संघर्ष करून १९९९ मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू केला. सुरुवातीच्या काळात कारखाना व्यवस्थित सुरू होता. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातून कारखान्याचे कर्ज थकल्याचे निमित्त करून कारखान्याची लिलावाद्वारे विक्री केली. आणि हा कारखाना स्वत: खरेदी केला.
२७ हजार सभासदांच्या मालकीचा असणारा हा कारखाना अजित पवारांनी स्वत:च्या मालकीचा करून घेऊन कोरेगाव, खटाव तालुक्यांतील सभासद शेतकरी यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे.
कारखाना खरेदी करण्यामध्ये अजित पवार यांना आ. शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना हिसका दाखवूनकारखाना गटाचे सर्व संचालक व सभासद कार्यकर्ते यांनी कोरेगाव येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. विजय कणसे यांनी शालिनीताई पाटील यांची समक्ष भेट घेऊन जरंडेश्वर कारखान्याचे, कोर्टामध्ये जे खटले सुरू आहेत, त्यास मदत करत आहेच व इथून पुढेही आमची मदत व सर्वतोपरी सहकार्य करून कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा होऊन कारखान्याचे तसेच सभासदांचे हित जोपासण्याचे काम करू,’ असे सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद कार्यकर्ते यांनी विजय कणसे यांना साथ देण्याचा निर्धार केला. (प्रतिनिधी)

कारखाना विक्रीत माजी पालकमंत्र्यांचाच हात
विद्यमान लोकप्रतिनिधींनी तसेच अजित पवार यांनी सभासद शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कारखाना खरेदी करण्यासाठीच आ. शशिकांत शिंदे यांनीच मदत केली आहे. त्यामुळे स्वहितासाठी काम करणाऱ्या आ. शिंदे यांना आता मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे. तरी सर्वांनी अ‍ॅड. विजय कणसे यांना साथ द्यावी,’ असे आवाहनही शालिनीताई पाटील यांनी कणसे याच्ंयाशी चर्चा झाल्यानंतर केले.

Web Title: Shinde-Ajitadad farmers' farmer Desododadala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.