शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सोलापुरात होणार शिखर बँकेचे विभागीय कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 4:03 PM

रिझर्व्ह बँकेने दिली परवानगी; राज्यातील सहावे कार्यालय, उस्मानाबाद जिल्हा जोडला

ठळक मुद्देदोन महिन्यांत राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू होईलसोलापूर व उस्मानाबादच्या साखर कारखाने, सूत गिरण्या व आमच्या कर्जदारांना पुणे, नांदेडला जावे लागणार नाहीसाखर सहसंचालक कार्यालय सोलापुरात सुरू झाल्याने अगोदरच कारखान्यांची सोय झाली आहेच

सोलापूर: महाराष्टÑ राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. राज्य बँकेच्या सोलापूरच्या सहाव्या विभागीय कार्यालयाला उस्मानाबाद जिल्हा जोडला आहे. 

राज्य बँकेची सध्या पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर व औरंगाबाद येथे सध्या विभागीय कार्यालये आहेत. मुंबई येथे मुख्यालय आहे. सोलापूरसाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव साखर सहसंचालक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मांडण्यात आला होता. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी स्वतंत्र साखर सहसंचालक कार्यालय सुरू झाले आहे. यामुळे सोलापूरच्या साखर कारखानदारांच्या पुणे व उस्मानाबादच्या कारखानदारांच्या नांदेडच्या चकरा बंद झाल्या आहेत.

आता राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू होणार असल्याने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या व राज्य बँकेचे अर्थसाहाय्य घेणाºया सहकारी संस्थांची सोय होणार आहे. सध्या राज्य बँकेकडून कर्ज घेणे व अन्य कामांसाठी सोलापूरच्या साखर कारखान्यांना पुणे तर उस्मानाबादच्या कारखान्यांना नांदेड येथे जावे लागत आहे.

साखर सहसंचालक कार्यालयापाठोपाठ राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात होणार असल्याने सहकार खात्याची मोठी दोन कार्यालये सोलापुरात आली आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक विचार केल्याने रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेला व विभागीय कार्यालयाला मंजुरी मिळाल्याचे राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांनी सांगितले. 

साधारण दोन महिन्यांत राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू होईल. सोलापूर व उस्मानाबादच्या साखर कारखाने, सूत गिरण्या व आमच्या कर्जदारांना पुणे, नांदेडला जावे लागणार नाही. साखर सहसंचालक कार्यालय सोलापुरात सुरू झाल्याने अगोदरच कारखान्यांची सोय झाली आहेच.- अविनाश महागावकर, संचालक, राज्य बँक मुंबई 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेTextile Industryवस्त्रोद्योगBanking Sectorबँकिंग क्षेत्रMaharashtra Bankमहाराष्ट्र बँक