शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटींची वाढ, विवरण पत्रांतील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:49 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रांत ही माहिती दिली आहे. त्यांची २०१४ ला एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० होती ती आता २०१९ ला २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ इतकी झाली आहे.

ठळक मुद्दे खासदार शेट्टी यांच्या मालमत्तेत दीड कोटींची वाढविवरण पत्रांतील माहिती, पाच वर्षात कोणतेही नवी मालमत्ता खरेदी नाही

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत १ कोटी ५२ लाख ६० हजार २६३ रुपयांची वाढ झाली आहे. शेट्टी यांनी लोकसभा हातकणंगले मतदार संघातून निवडणूकीचा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला त्यामध्ये त्यांनी सादर केलेल्या विवरण पत्रांत ही माहिती दिली आहे. त्यांची २०१४ ला एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार ७० होती ती आता २०१९ ला २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ इतकी झाली आहे.

टक्केवारीचा विचार करता त्यांच्या मालमत्तेत तिप्पट वाढ झाली आहे. या पाच वर्षांत त्यांनी कोणतीही मालमत्ता, शेतजमिन विकत घेतलेली नाही. जुन्याच मालमत्तेची किंमत वाढल्याने त्यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे विवरण पत्रात दिसते.मालमत्ता वाढण्याची त्यांनी स्वत:हून कारणे दिली आहेत त्यामध्ये १) मुंबई येथील म्हाडाच्या फ्लॅटची किंमत २०१४ ला ४५ लाख होती, तो विकल्यावर त्याची किंमत १ कोटी ४३ लाख रुपये मिळाली. त्यामध्येच ९८ लाख रुपये जास्त मिळाले. २) गेल्या पाच वर्षात कोणतीही जमिन खरेदी नाही परंतू २०१४ पेक्षा सरकारी मुल्यांकनात वाढ झाल्याने जमिनीची किंमत १० लाख ७० हजार इतकी वाढली ३) घर बांधकामासाठी लोकवर्गणीतून २२ लाख रुपये जमा झाले. ४) शासकीय मानधन व विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम करताना मिळालेल्या भत्यांमध्ये वाढ झाली.अ) विवरण पत्रांतील पाच वर्षांतील उत्पन्नाचे तपशील : २०१४-१५ ते २०१८-१९ एकूण१)शासकीय मानधन : १ कोटी ३२ लाख २ कोटी ७७ लाख ००८ ७ कोटी ३५ लाख ७००८२)शासकीय भत्ता : ३ कोटी १० लाख ३९२२ १ कोटी १४ लाख ५४६४ ११ कोटी १४ लाख १९२१३) शेती उत्पन्न : १२ लाख ९१२ ३२ लाख ५००० १ कोटी १० लाख ८१५५४) मुंबई फ्लॅटचे भाडे : ३ लाख ३६ हजार (विक्री केल्याने भाडे नाही) १ कोटी १२ लाख १०००एकूण उत्पन्न ४ कोटी ८८ लाख ८३४ ३ कोटी ५४ लाख ७४७२ २ कोटी ७२ लाख ८०८४

 ब) मालमत्ता तपशील २०१४ २०१९१) रोख शिल्लक - १७ हजार २७ हजार२) बँक शिल्लक - १ कोटी ३२०८ १ कोटी ४० लाख ७४०५ ३) शेअर्स - १२ लाख ३५० २३ लाख ३२५०४) विमा रक्कम - ७ लाख ४० हजार ६६४ १९ लाख २४ हजार १९७५) वाहन - १४ लाख ८० हजार १५ लाख ४७ हजार ७००६) सोने-जिन्नस - ३ लाख ३० हजार ५ लाख ५८ हजार ७९०७) शेत जमीन - १७ लाख २७ लाख ७० हजार २५०८)म्हाडा फ्लॅट - ४५ लाख९) गुंतवणूक - स्वाभिमानी दूध - ०० २५ लाख ९० हजार१०)गुंतवणूक - स्वाभिमानी एमआयडीसी-०० ५३ लाख ६९ हजार११) इतर गुंतवणूक : ०० ५ लाख ३० हजार१२) घर बांधकाम : ०० ७४ लाख ६३ हजार ८००१३) कर्जे : १ कोटी ५० लाख ४१५२ ७ कोटी ७४ लाख ०५९एकूण : ८३ लाख ८४ हजार ०७० २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३

रोख अवघे २७ हजारमहाराष्ट्रातील अनेक खासदार असे आहेत की त्यांच्या पँटचा साधा एक खिसा झाडला तरी त्यातून ५-५० हजार रुपये सहज पडतात. शेट्टी यांच्या बँक खात्यावर मात्र आजची रोख शिल्लक २७ हजार इतकीच आहे.

पत्नी व मुलाच्या नांवावरील संपत्तीखासदार शेट्टी यांच्या पत्नी संगीता यांच्या नांवावर अवघी ३ हजार २४२ व मुलग्याच्या नावांवर १३ हजार ५० रुपयांची बँक शिल्लक आहे. मुलग्याच्या नांवावर २ हजारचे शेअर्स आहेत. पत्नीचा विमा ७९ हजार १६० तर मुलग्याच्या ३ लाख ८० हजार ४०८ चा विमा आहे.

मुलग्याकडे ९० हजाराचे वाहन आहे. त्यांची पत्नी कोणतेही वाहन वापरत नाही. पत्नीकडे ३ लाख ९४ हजार ४४० रुपयांचे तर मुलग्याकडे ३२ हजार ८७० रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. प्रस्थापित राजकारणी व त्यांच्या बायकामुलांच्या नावांवर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असते त्या तुलनेत शेट्टी यांचे कुटुंबीय अगदीच सर्वसामान्य असल्याचे दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना