शेकापच्या नमिता नाईक यांचे निधन
By Admin | Updated: July 19, 2015 01:42 IST2015-07-19T01:42:42+5:302015-07-19T01:42:42+5:30
अलिबागच्या माजी नगराध्यक्षा तथा शेकापच्या विद्यमान नगरसेविका नमिता नाईक (४१) यांचे शनिवारी पुण्यात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती

शेकापच्या नमिता नाईक यांचे निधन
अलिबाग : अलिबागच्या माजी नगराध्यक्षा तथा शेकापच्या विद्यमान नगरसेविका नमिता नाईक (४१) यांचे शनिवारी पुण्यात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुलगी अदिती, अक्षया आणि सासू सुनीता नाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अलिबागमध्ये शोककळा पसरली आहे. पुणे येथे नमिता नाईक यांच्या गाडीला २ जुलै रोजी अपघात झाला होता. यात ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या नमिता नाईक २००६ सालापासून राजकारणात सक्रिय होत्या. नगरसेवक ते नगराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.