शीना बोरा हत्याप्रकरण : पीटर मुखर्जींच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: November 26, 2015 22:29 IST2015-11-26T18:45:27+5:302015-11-26T22:29:56+5:30
बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या कोठडीत गुरुवारी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

शीना बोरा हत्याप्रकरण : पीटर मुखर्जींच्या कोठडीत वाढ
ऑनलाइन लोकमत
मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या कोठडीत गुरुवारी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा दावा सीबीआयने केला. भारत आणि इंग्लंडमध्ये पीटर आणि इंद्राणीची मालमत्ता आहे. मात्र या मालमत्तेबाबत दोघांकडूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. तसेच शीनाच्या एचएसबीसी बॅंकेच्या खात्यात पैसे ठेवण्यात आल्याचा अंदाज असून याप्रकरणी एचएसबीसी बॅंकेच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी इंटरपोलकडे मागणी केली आहे. याचबरोबर आणखी काही पैसांसदर्भात चौकशी करण्यासाठी आणि पीटर मुखर्जी यांची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी सीबीआयने पीटर मुखर्जींच्या कोठडीत अजून काही दिवस वाढ करण्याची मागणी केली. त्यावर कोर्टाने पीटर मुखर्जींच्या सीबीआय कोठडीत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.