शीला कोल्हटकर यांचं निधन

By Admin | Updated: August 26, 2016 17:04 IST2016-08-26T17:04:15+5:302016-08-26T17:04:15+5:30

लहानपण देगा देवा, वाहतो ही दुर्वांची जुडी, देव दीनाघरी धावला आदी लोकप्रिय नाटकांची निर्मिती केलेल्या 'दुर्वांची जुडी' या प्रख्यात नाट्यसंस्थेची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती शीला

Sheela Kolhatkar passed away | शीला कोल्हटकर यांचं निधन

शीला कोल्हटकर यांचं निधन

ऑनलाइन लोकमत
मंबई, दि.26, - लहानपण देगा देवा, वाहतो ही दुर्वांची जुडी, देव दीनाघरी धावला आदी लोकप्रिय नाटकांची निर्मिती केलेल्या 'दुर्वांची जुडी' या प्रख्यात नाट्यसंस्थेची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती शीला कोल्हटकर यांचे मध्यरात्रीच्या सुमारास प्रदीर्घ आजारात येथे निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. महाराष्ट्राचा छोटा गडकरी अशी ओळख असलेले नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या त्या पत्नी होत्या. 
शीला कोल्हटकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगी भाषा, जावई अमर फाटक आणि नात आभा असा परिवार आहे.

 

Web Title: Sheela Kolhatkar passed away