‘ती’ गाडी भाग्यश्रीच चालवत होती

By Admin | Updated: May 14, 2017 05:27 IST2017-05-14T05:27:54+5:302017-05-14T05:27:54+5:30

सांताक्रूझमध्ये झालेल्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी भाग्यश्री दासानीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले

'She' was running a car with luck | ‘ती’ गाडी भाग्यश्रीच चालवत होती

‘ती’ गाडी भाग्यश्रीच चालवत होती

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी सांताक्रूझमध्ये झालेल्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी भाग्यश्री दासानीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अपघातादरम्यान भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे भाग्यश्रीच्या अडचणी वाढणार आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सांताक्रूझ पश्चिमेकडील व्होडाफोन गॅलरीसमोरील चौकात सिग्नलवर थांबलेल्या तौसिफ शेख (३०) या तरुणाच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या गाडीने धडक दिली. यात तौसिफच्या पायाला जबर जखम झाली. त्या वेळी तौसिफने स्कोडा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवरून अभिनेत्री भाग्यश्रीला उतरताना पाहिले होते. अपघात भाग्यश्रीच्या वाहनचालकाने केल्याचा दावा दासानी कुटुंबाने केला होता. तर प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याचे समोर आले.
सांताक्रूझ पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात, याच माहितीच्या आधारे भाग्यश्रीच गाडी चालवत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: 'She' was running a car with luck