नाश्ता सोबत त्यांने खाल्ले वटवाघुळ !
By Admin | Updated: July 21, 2016 22:54 IST2016-07-21T22:54:49+5:302016-07-21T22:54:49+5:30
स्थानिक जिल्हा न्यायालय परिसरातील उपाहारगृहात (कॅन्टिन) जीआरपी पोलिस कर्मचारी गौतम एच. शिरसाट हे गुरुवारी नाश्ता करत असतांना त्यांच्या प्लेटमध्ये

नाश्ता सोबत त्यांने खाल्ले वटवाघुळ !
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि.21 - स्थानिक जिल्हा न्यायालय परिसरातील उपाहारगृहात (कॅन्टिन) जीआरपी पोलिस कर्मचारी गौतम एच. शिरसाट हे गुरुवारी नाश्ता करत असतांना त्यांच्या प्लेटमध्ये अचानक वटवाघुळ पडले. ते त्यांच्या मित्रासोबत नास्ता करताना गप्पा करीत असल्याने प्लेटकडे लक्ष गेले नाही व अनावधानाने ते वटवाघुळ घासासोबत तोंडात टाकल्या गेले. शिरसाट यांना ते चटकन जावले व त्यांनी घास फेकला व वटवाघुळ बाहेर फेकल्या गेले यावेळी शिरसाट यांना ओकाऱ्या झाल्यामुळे त्यांना तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना घडली.
अकोला जीआरपी ठाण्याचे कर्मचारी गौतम शिरसाट हे गुरुवारी एका प्रकरणात साक्ष नोंदविण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा न्यायालयात आले. दुपारच्या सुमारास त्यांनी न्यायालय परिसरातील उपाहारागृहात आलूवडा व मुंगवडा घेतला. नाश्ता करत असताना अचानक त्यांच्या प्लेटमध्ये वटवाघुळाचे पिल्लू पडले. मित्रांसोबत बोलता-बोलता अनावधानाने शिरसाट यांनी घासाबरोबर ते तोंडात टाकले. तोंडात काहीतरी गेल्याची शंका येताच त्यांनी घास बाहेर फेकला. यानंतर त्यांना ओकाऱ्या झाल्या. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर उपाहारगृह अस्थायीपणे बंद करण्यात आले.