तिने घेतले मुलीच्या अपंगत्वाचे ओझे

By Admin | Updated: June 29, 2014 00:52 IST2014-06-29T00:52:46+5:302014-06-29T00:52:46+5:30

घरात आधीच दारिद्र्य. या परिस्थितीतही त्या मातेने आपल्या मुलीला अपंगत्वाचा विचार कधीही शिवू दिला नाही. इतकेच नाही तर त्या अपंगत्वामुळे आपले काहीही बिघडणार नाही, हे तिने तिच्या अंगी भिनवले.

She took the burden of the disability of the girl | तिने घेतले मुलीच्या अपंगत्वाचे ओझे

तिने घेतले मुलीच्या अपंगत्वाचे ओझे

आईच्या मदतीने गायत्रीने संपादन केले यश
सुमेध वाघमारे - नागपूर
घरात आधीच दारिद्र्य. या परिस्थितीतही त्या मातेने आपल्या मुलीला अपंगत्वाचा विचार कधीही शिवू दिला नाही. इतकेच नाही तर त्या अपंगत्वामुळे आपले काहीही बिघडणार नाही, हे तिने तिच्या अंगी भिनवले. ती स्वत:ही कधीच हतबल झाली नाही आणि मुलीलाही अपंगत्वाचे ओझे वाटू दिले नाही. परिणामी त्या अपंग मुलीनेही अपंगत्वाची सल टोचू न देता यश संपादन केले.
अरविंदनगर येथील झोपडपट्टीत राहणारी गायत्री राजू मेश्राम त्या अपंग मुलीचे नाव. गायत्रीला दहावीच्या परीक्षेत ६४ टक्के गुण मिळाले. इतरांच्या नजरेतून हे फार कमी गुण असले तरी ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या आनंदासारखाच आनंद गायत्रीच्या आई-वडिलांना झाला आहे. विशेषत: जीवाचे रान करणारी तिची आई माया हिला आपल्या पोरीचे किती कौतुक करू असे झाले आहे.
पवननगर येथील महाराष्ट्र हायस्कूलची गायत्री विद्यार्थिनी आहे. गायत्री जन्मत:च अपंग.
स्वत:चे नैसर्गिक विधीही पार पाडण्यासाठी घ्यावी लागणारी दुसऱ्याची मदत... एकूणच उमेद हरण्याची परिस्थती... असे असतानाही तिच्या आईने अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे, तिच्यामध्ये ही विशेषत्वाची जाणीव करून दिली. अपंगत्वावर मात करण्यासाठी ती माता आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. घरापासून शाळा साधारण दोन किलोमीटर अंतरावर. त्यातही धड रस्ता नाही. त्या माऊलीने एका संस्थेच्या मदतीने ट्रायसिकल मिळविली. गायत्रीला त्यात बसवून रोज शाळेत घेऊन जायची.

Web Title: She took the burden of the disability of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.