'ती' महिला माझ्या मुलीसारखी- गिरीश बापट

By Admin | Updated: June 17, 2016 18:35 IST2016-06-17T18:22:28+5:302016-06-17T18:35:59+5:30

भाजपा नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली

'She' is like my daughter - Girish Bapat | 'ती' महिला माझ्या मुलीसारखी- गिरीश बापट

'ती' महिला माझ्या मुलीसारखी- गिरीश बापट

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 17- भाजपा नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसची टीकेची पातळी घसरली असून, काँग्रेसवाले खालच्या स्तरावर आणि गलिच्छ आरोप करत सुटल्याचं वक्तव्य गिरीश बापटांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोमध्ये दिसत असलेली ती महिला माझ्या मुलीसारखी असून, खुलासा करावा लागणं हे दुर्दैव असल्याचं बाटप म्हणाले आहेत. आमचं सरकार स्वच्छ कारभार करत आहे. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला आहे. चौकशीत खरं काय ते निष्पन्न होईल, असंही म्हणत एक प्रकारे बापटांनी खडसेंना समर्थन दिलं आहे. 
 
गिरीश बापटांच्या वार्तालापातील मुद्दे
 
- निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासन पक्ष पूर्ण करणार
- रेशन कार्डसाठी आधार बंधनकारक
- तूरडाळ प्रश्नात देशातून 70 टक्के आयात करावी लागते
- जो तूर लावेल त्याला प्रोत्साहन निधी देण्याचा विचार
- इतर देशात मोठ्या प्रमाणात तूर होते
- तूरडाळचे ब्लॅक मार्केट होणार नाही
- 68 लाख लोकांना 5 किलो धान्य दिले 
- रेशन कार्ड स्माट कार्ड करणार
- आधार लिंकअप आहे का हे बघतो आहे
- जनधन योजना रॉकेल मार्केट रेटने देणार
- सबसिडी खात्यावर जाईल
- काळा बाजार होणार नाही
 

Web Title: 'She' is like my daughter - Girish Bapat