शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाझरेतील ‘ती’ घटना ‘वॉटर स्प्रॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 05:16 IST

पुणे - वादळ, वावटळ आपण अनेक पाहिली असतील,पण शुक्रवारी पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाझरे जलाशय परिसरातील ती ‘वावटळ’ सोशल मीडियासह सर्वत्र चर्चिली गेली. अचंबित करणारा नेमका हा प्रकार काय आहे? याबाबत पर्यावरण व हवामान तज्ज्ञांशी चर्चा केली असता, हवामानाचा हा अनोखा आविष्कार होता़ नाझरे येथे दिसले ते आपल्याकडे क्वचित होणारे ‘वॉटर ...

पुणे - वादळ, वावटळ आपण अनेक पाहिली असतील,पण शुक्रवारी पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाझरे जलाशय परिसरातील ती ‘वावटळ’ सोशल मीडियासह सर्वत्र चर्चिली गेली. अचंबित करणारा नेमका हा प्रकार काय आहे? याबाबत पर्यावरण व हवामान तज्ज्ञांशी चर्चा केली असता, हवामानाचा हा अनोखा आविष्कार होता़ नाझरे येथे दिसले ते आपल्याकडे क्वचित होणारे ‘वॉटर स्प्रॉट’ असल्याचे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़शुक्रवारी दुपारनंतर पुणे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटसह पाऊस झाला. नाझरे जलाशयात सायंकाळी एक वादळ निर्माण झाले. पण ते नाझरे धरणावर होते. त्याने धरणातले पाणी खेचले आणि वर ढगात घेऊन गेले. तीन मिनिटे हा प्रकार सुरू होता. याचा व्हीडीओ व्हायलर झाल्याने नेमका का काय प्रकार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.डॉ़ कुलकणी यांनी सांगितले की, अमेरिकेत टोरनॅडो बऱ्याच वेळा होतात. जेव्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असते अशावेळी हवेचा दाब एकदम कमी होतो़ तो नेहमीपेक्षा निम्म्याने कमी झालेला असतो़ त्यात ढगातील पाणी एका टनेलप्रमाणे झोत खाली येतो़ ज्याप्रमाणे चक्रीवादळात अथवा वावटळीत सर्व वस्तू चक्राकार फिरत त्यात उचलल्या जातात़ त्याप्रमाणे यात त्यात सापडणाºया सर्व वस्तू उचलल्या जातात़ अगदी गाड्याही उचलण्याची ताकद या वावटळीत असते़ जमिनीवर हे आले तर, त्याला टोरनॅडो म्हटले जाते आणि पाण्यावर आल्यावर त्याला ‘वॉटर स्प्रॉट’ असे म्हणतात़अनेकदा आपल्याला माशांचा पाऊस पडल्याचा बातम्या वाचनात येतात़ तो याचाच प्रकार असतो़ एखाद्या ठिकाणी पाण्यावर असा चक्रवात आल्यावर त्यात पाण्याबरोबरच त्यातील मासेही उचलले जातात आणि ते नंतर दूर कोठेतरी जाऊन पडतात़ तेव्हा तेथे माशांचा पाऊस असे दिसते़ आपल्याकडे हा प्रकार क्वचितच होतो़ आता मोबाईलमुळे हा प्रकार चित्रित झाल्याने तो सर्वांना समजला, असे डॉ़ कुलकर्णी यांनी सांगितले़अमेरिका, मेक्सिको, युरोपचा काही भाग, रशिया, आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिलिपिन्स, ब्राझिल-उरुग्वे, दक्षिण आफ्रिका, पूर्व चीन, जपान, अगदी बांगलादेश आणि आपल्याकडं गंगेच्या खोºयातसुद्धा ‘टोरनॅडो’ आढळते, असे पर्यावरणाचे अभ्यासक अभिजित घोरपडे यांनी सांगितले.ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले की, गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पाणी जमिनीकडून आकाशाकडे जाऊ शकत नाही. हिवाळ्यात धुके ज्याप्रमाणे वर जाताना दिसते, त्याप्रमाणे पाण्याची वाफ आकाशाकडे जाऊ शकते.

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे