‘ती’ नेच साकारला ‘ती’चा गणपती!
By Admin | Updated: September 5, 2016 18:52 IST2016-09-05T18:50:24+5:302016-09-05T18:52:46+5:30
‘ती’चा गणपती ही संकल्पना राबविण्यास प्रारंभ झाला. या उपक्रमात स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंतचे संपूर्ण विधी महिलांद्वारेच पार पाडले जातात.

‘ती’ नेच साकारला ‘ती’चा गणपती!
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ५ - ‘लोकमत’ सखी मंचच्यावतीने अकोल्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘ती’चा गणपती ही संकल्पना राबविण्यास प्रारंभ झाला. या उपक्रमात स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंतचे संपूर्ण विधी महिलांद्वारेच पार पाडले जातात.
यंदाची विशेष बाब अशी की, गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापित करण्यात येणारी गणरायाची मूर्ती ‘ती’ स्वत:च साकारत आहे. आकाशवाणीमागे शास्त्रीनगरात राहणाºया सुप्रिया महादेवराव रोठे या कलावंत महिलेने ‘ती’चा गणपती साकारला असून या गणपतची आज उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणपत्ती बाप्पा मोरया म्हणत शक्ती आणि बुद्धीचा अधिपती गणरायाचे स्वागत लोकमत सखी मंच सदस्यांनी जल्लोषात केले. लोकमत सखी मंचतर्फे स्त्री शक्तीचा अनोखा संदेश देण्याच्या जाणीवेतून ‘ती’ चा गणपती या उपक्रमांतर्गत गणरायाची स्थापना केली.
‘ती’ चा गणपती या उपक्रमाद्वारे गणरायाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंतचे पुढील दहा दिवस महिलांच्याच हातून संपूर्ण पुजाविधी करण्यात येणार आहेत. ‘ती’ च्या गणपतीची लोकमत कार्यालयासमोरून वाजत - गाजत मिरवणूक काढून सखींनी व्द्यांवर ताल धरला. त्यानंतर ‘ती’ च्या गणपतीची स्थापना करण्यात आली. ‘ती’चा गणपती या उपक्रमांतर्गत घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.