शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मुलीला डॉक्टर बनवत ‘ति’ने मिटवला वेश्या असल्याचा डाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 09:57 IST

कोवळ्या वयात नरकयातना भोगत घरी पैसे पाठवून आईवडिलांचा संसार सावरत असताना तिला एक सोबती मिळाला.

ठळक मुद्देमुलगा घेतोय महाविद्यालयीन शिक्षण : पतीच्या सोबतीने उभारला सोन्यासारखा संसार

- लक्ष्मण मोरे - 

पुणे : घरच्या आर्थिक हलाखीमुळे देवदासी म्हणून सोडल्यानंतर वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली. कोवळ्या वयात नरकयातना भोगत घरी पैसे पाठवून आईवडिलांचा संसार सावरत असताना तिला एक सोबती मिळाला. त्याच वस्तीत मजुरी करणाऱ्या तरुणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर तिच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. जिद्दीने स्वत:च्या मुलांना शिक्षण दिले. ‘पेशा’च्या पलिकडे जाऊन मुलीला डॉक्टर बनवित ‘ति’ने स्वत:च्याच जगण्याला सन्मान मिळवून दिला आहे.    संगव्वा (बदलेले नाव) कर्नाटकातील जमंडी जवळच्या एका गावामध्ये आईवडिलांसह राहात होती. तिला अगदी अल्लड वयातच अंधश्रध्देमुळे देवदासी म्हणून सोडण्यात आले. साधारणपणे ३० वर्षांपूर्वी ओळखीमधूनच  ती बुधवार पेठेतील वेश्या वस्तीमध्ये पैसे कमाविण्यासाठी दाखल झाली. याठिकाणी अन्य मुलींसोबत चेहºयाला रंगरंगोटी करायची आणि रस्त्यावर ग्राहकाची वाट पाहत उभे राहायचे हा दिनक्रम बनला होता.शरीराची भूक भागविण्यासाठी येणाºया ग्राहकांच्या आपुलकीच्या शब्दांमागील कोरडेपणा तिला नकोसा वाटत होता. पण इलाज नव्हता. गावी आईवडिलांनाही पैसे पाठवावे लागत होते.   याच काळात ती ज्या ठिकाणी उभी राहायची तेथे समोरच असलेल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये एक तरुण मजुरी करायचा. त्याला संगव्वा आवडत होती. संगव्वा तयार झाली पण तिने वेश्या व्यवसाय सोडणार नाही अशी अट घातली. त्याने ती मान्य केली. दोघांनी लग्न केले. दोघांनीही हळूहळू पैसे साठवत वेश्यावस्तीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला. पुण्याच्या दक्षिण भागात सुरुवातीला भाड्याने घर घेतले. दरम्यान, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला.    आपल्या मुलांना सन्मानाचे जगणे मिळायला हवे यासाठी दोघांनी त्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांना शाळेत घालण्यात आले. याच काळात संगव्वाचे पती काम करीत असलेले दुकान दोघांनी मिळून चालविण्यास घेतले. तिने वेश्याव्यवसाय बंद करुन पूर्णवेळ दुकानामध्ये द्यायला सुरुवात केली. मुली मोठ्या झाल्या होत्या. थोरल्या मुलीचे फारसे शिक्षण झाले नाही. तिचे हैदराबाद येथील तरुणासोबत चांगल्या घरात लग्न लावून देण्यात आले. दुसऱ्या मुलीसह मुलाकडे मात्र दोघांनी शिक्षणाचा आग्रह धरला. धाकट्या मुलीने आपली आई नेमके काय काम करते याची जाणीव ठेवत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. मेडीकलचे शिक्षण पूर्ण करुन ती डॉक्टर झाली. ती सध्या दक्षिण पुण्यातल्या मोठ्या रुग्णालयात काम करते. मुलगाही सध्या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत आहे.     संगव्वा सांगत होती, मुलीच्या यशामुळे मला गगन ठेंगणे झाले होते. आयुष्यभर भोगलेल्या यातनांचे मुलीच्या रुपाने फळ मिळाल्याचे आणि माझ्या कपाळी बसलेला वेश्येचा डाग मिटल्याची भावना संगव्वाने व्यक्त केली. विशेष म्हणजे मुलांनाही आईच्या  ‘पेशा’बद्दल आणि तिने भोगलेल्या यातनांची पूर्ण जाणिव आहे. मुलंही या मातेच्या कष्टांबाबत कृतज्ञ आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMothers Dayमदर्स डेProstitutionवेश्याव्यवसायdoctorडॉक्टरmarriageलग्न