दुकानदाराची उधारी देण्यासाठी पैसे मागितल्याने पत्नीला पेटवले
By Admin | Updated: August 13, 2016 21:26 IST2016-08-13T21:26:46+5:302016-08-13T21:26:46+5:30
दुकानदाराची उधारी देण्यासाठी पैसे मागिल्याने पतीने पत्नीस पेटवून देण्याची धक्कादायक घटना भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे शनिवारी घडली

दुकानदाराची उधारी देण्यासाठी पैसे मागितल्याने पत्नीला पेटवले
>- ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - दुकानदाराची उधारी देण्यासाठी पैसे मागिल्याने पतीने पत्नीस पेटवून देण्याची धक्कादायक घटना भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे शनिवारी घडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी आईने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. प्रांजली राजेंद्र सुरवसे (वय- ३४) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे.
सोलापूर शहरापासून जवळच असलेल्या भोगाव येथे राजेंद्र सुरवसे कुटुंब वास्तव्यास आहे. परिस्थिती बºयापैकी. शनिवारी राजेंद्र आणि पत्नी प्रांजली या दोघांमध्ये दुकानदाराचे उधारीचे पैसे देण्यावरुन कुरबूर झाली. बोलता बोलता भांडण विकोपाला गेले आणि रागाच्या भरात पती राजेंद्रने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. भाजलेल्या अवस्थेत प्रांजलची आई उषा रणदिवे हिने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस चौकीत प्रांजलच्या आईने दिलेल्या माहितीनुसार नोंद करण्यात आली आहे. रॉकेलचा भडका उडाल्याने प्रांजलच्या छातीस, पाठिस आणि कमरेला इजा पोहचली आहे. ती ४५ टक्के भाजली असल्याचे रुग्णालयात सूत्रांनी सांगितले.