घसरून पडल्याने शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर
By Admin | Updated: December 3, 2014 11:11 IST2014-12-03T10:16:47+5:302014-12-03T11:11:28+5:30
दिल्लीतील निवासस्थानी पाय घसरून पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

घसरून पडल्याने शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - दिल्लीतील निवासस्थानी पाय घसरून पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पवार पुढील उपचारासाठी मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले असून अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील नियोजीत दौराही रद्द केला आहे.
बुधवारी सकाळी पवार हे दिल्लीतील जनपथ येथील निवासस्थानी पाय घसरून पडले. यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या हातालाही किरकोळ दुखापत झाली आहे. शऱद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा आणि कन्या सुप्रिया सुळे आहेत.