शारापोव्हा-बुकार्ड उपांत्य फेरीत झुंजणार
By Admin | Updated: June 3, 2014 23:36 IST2014-06-03T23:36:32+5:302014-06-03T23:36:32+5:30
स्पेनच्या गारबीन मुगुरुजाचा 1-6, 7-5, 6-1 ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली.

शारापोव्हा-बुकार्ड उपांत्य फेरीत झुंजणार
>फ्रेंच ओपन टेनिस : अँडी मरेची आगेकूच; स्पेनची गारबीन पराभूत
पॅरिस : गतउपविजेती व सातवे मानांकन प्राप्त रशियाच्या मारिया शारापोव्हाने निराशाजनक सुरुवातीनंतर मंगळवारी जायंट किलर स्पेनच्या गारबीन मुगुरुजाचा 1-6, 7-5, 6-1 ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली. 2क्12 मध्ये या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविणा:या शारापोव्हाने आज खेळल्या गेलेल्या लढतीत सुरुवातीला सलग चार गेम गमाविले. पहिला सेट गमाविल्यानंतर सूर गवसलेल्या शारापोव्हाने नंतरचे दोन सेट जिंकत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.
उपांत्य फेरीत शारापोव्हावा 18 व्या मानांकित कॅनडाच्या युजेनी बुकार्डच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बुकार्डने 14 व्या मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेज नव्हारोची झुंज 7-6, 2-6, 7-5 ने मोडून काढली.
शारापोव्हाने दुस:या सेटच्या सुरुवातीला ब्रेक मिळविला आणि त्यानंतर मुरुगुजावर वर्चस्व गाजवित विजयाला गवसणी घातली. मुरुगुजाने दुस:या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या गतविजेत्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला पराभवाचा धक्का दिला होता. (वृत्तसंस्था)
सानिया- कारा पराभूत
भारतीय टेनिसपटू सानिया मिङर व तिची सहकारी कारा ब्लॅक यांना मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सु वेई सिए व शुआई पेंग या जोडीविरुद्ध सानिया-कारा यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पाचव्या मानांकित भारत-ङिाम्बाब्वेच्या जोडीचा सु वेई व पेंग या जोडीने 2-6, 6-3, 3-6 ने पराभव केला. यंदाच्या मोसमात सानिया-कारा यांना या जोडीकडून तिस:यांदा पराभव स्वीकारावा लागला. आज जवळजवळ 2 तास रंगलेल्या लढतीत सानिया-कारा जोडीला आठ ब्रेक पॉईंट मिळाले, पण त्यांना केवळ 3 ब्रेक पॉईंटवर गुण वसूल करता आले.