शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज ‘शिवबंधन’ बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 07:00 IST

मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे हे हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

नारायणगाव : मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे हे हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना भवनात दुपारी २ वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांना शिवबंधन बांधणार आहेत. मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच आपण शिवसेनेच्या स्वगृही परतत आहोत, अशी माहिती आमदार शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.नारायणगाव येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सोनवणे यांनी ही माहिती दिली. यावेळी पिंपळवंडीचे उपसरपंच प्रदीप चाळक, संदीप लेंडे, पिंपळगावचे सरपंच निखिल गावडे, महेश शेळके, लहू वायकर, अभय वाव्हळ आदी उपस्थित होते.सोनवणे म्हणाले, की शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी राज ठाकरे यांची भेट घेऊन ग्रामीण भागात मनसे पक्ष लवकर वाढणार नाही, मला शिवसेनेकडून विचारणा केली जात असल्याचे सांगून त्यांच्याशी सर्व चर्चा केल्यानंतरच, आपण शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली. याभेटी प्रसंगी आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे हेदेखील होते. मुख्यमंत्र्यांनी भाजपामध्ये येण्यास आपणास आमंत्रण दिले होते. मात्र, जुन्नर विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने ही जागा आपण शिवसेनेकडे मागू आणि त्यांना हवी ती जागा देऊ, असे मुख्यमंत्री बोलले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास आपणांस हिरवा कंदील दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.नाराजी दूर करणारजुन्नर तालुक्यातील नाराज शिवसैनिकांची आपण वैयक्तिक भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार आहोत. आजही हजारो शिवसैनिक आपल्या प्रवेशाने आनंदी आहेत. जे पदाधिकारी शिवसेनेपासून दूर गेलेले आहेत, त्यांना पक्षात परत आणून त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आपले नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत, असे सोनवणे म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे