दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!
By Admin | Updated: November 16, 2014 01:46 IST2014-11-16T01:46:56+5:302014-11-16T01:46:56+5:30
एनकूळ गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाच्या विकासाचा आराखडा ठरविला.

दहावीच्या वर्गात शरद पवारांनी आखला विकासाचा आराखडा!
वडूज (जि़ सातारा) : एनकूळ गावातील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाच्या विकासाचा आराखडा ठरविला. शाळेतील दहावीच्या वर्गात बसून शनिवारी त्यांनी सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या दीड तासाच्या कालावधीत गावच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली.
खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत आदींच्या उपस्थितीत पवारांनी गावाच्या विकासाचा निर्धार केला.
शनिवार असल्याने सकाळी साडेसात ते साडेअकरार्पयत शाळा होती; पण या बैठकीमुळे सकाळी दहा वाजताच शाळा सोडण्यात आली होती. मुले मैदानावर थांबली होती. बैठकीनंतर पवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी दहावीच्या वर्गाबाहेर आले. त्यावेळी महर्षी शिंदे विद्यालयातील मुलींनी स्वागतगीत गायले. त्यानंतर पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावच्या विकासाबाबत काही सूचना असतील तर त्या माङयाकडे करा, असेही त्यांनी ग्रामस्थांना सुचविले. तसेच बैठकीनंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
पाय ठेवायला जागा नव्हती
3क्क्क् लोकसंख्या असलेले एनकूळ हे गाव 2क्क्9 मध्ये निर्मल ग्राम ठरले होते. विकासाचा आणि पाण्याचा दुष्काळ असला, तरी बुद्धिजीवी वर्गाचा सुकाळ या गावात आहे. गावचे सुपुत्र व मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. सुदाम खाडे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन गाव दत्तक घेतल्याबद्दल आभार मानले होते. पवारांना भेटण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ग्रामस्थ शाळेच्या मैदानात दाखल झाले होते.
एनकूळ हे गाव आदर्श आहे. उन्हाळ्याचे चटके सुरू झाले की टँकर सुरू व्हायचा. जिरायत क्षेत्र आहे, ते बारमाही बागायत करण्याचा माझा प्रयत्न राहील. माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली तेव्हा या गावात पायही ठेवला नव्हता, तरीही गावाने मला 94 टक्के मतदान केले होते. याचा मला अभिमान आहे.
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री