शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

...तर हवामानतज्ज्ञांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन,  शरद पवारांचा हवामान अंदाजावर  टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 20:07 IST

हवामान खात्याचा अंदाज खरा ठराला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे.

बारामती, दि. 19 - हवामान खात्याचा अंदाज खरा ठराला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला टोला हाणला आहे. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ‘ त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन’ असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही. तसेच, कर्जमाफीत शेतक-यांनी कर्जमाफ झाले आहे, असे पत्र बँकेत दिले आहे, असे मला कोठे दिसले नाही, अशीही टीका त्यांनी केली. युवा पिढी शेतीपासून दूर झाली तर देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल. आज युवापिढी शेती सोडून राजकारणात अधिक रस घ्यायला लागला आहे. युवकांना विचारल्यावर जिल्हा परिषद सदस्यापासून ते खासदारांपर्यंत स्वप्न रंगवले जातात. ही बाब आक्षेपार्ह नसली तरी अर्थकारणावर मोठे परिणाम करणारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी