शरद पवारांच्या हाती झाडू

By Admin | Updated: November 15, 2014 02:58 IST2014-11-15T02:58:47+5:302014-11-15T02:58:47+5:30

राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात प्रेमाचे दिवस सुरू झाले असून, त्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्क हातात झाडू घेऊन स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग नोंदवला.

Sharad Pawar's broom | शरद पवारांच्या हाती झाडू

शरद पवारांच्या हाती झाडू

मोदींचे केले गुणगान : स्वच्छ भारत मोहिमेत सक्रिय सहभाग
पुणो : राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात प्रेमाचे दिवस सुरू झाले असून, त्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चक्क हातात झाडू घेऊन स्वच्छतेच्या मोहिमेत सहभाग नोंदवला. राष्ट्रवादीला भ्रष्टवादी म्हणणा:या नरेंद्र 
मोदी यांच्यावर आगपाखड करणा:या पवार यांनी शुक्रवारी मोदींचे गुणगान करीत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. 
शरद पवार यांचा गड म्हणून ओळखल्या 
जाणा:या बारामती शहरात झालेल्या या कार्यक्रमात पवार यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पक्षाचे सरचिटणीस डी़ पी़ त्रिपाठी हेही सहभागी झाले होता. कॅमे:याच्या लखलखाटात झालेल्या या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेला आपला पाठिंबा असल्याचा संदेश पवार यांनी दिला. 
पण एनडीएला असा पाठिंबा देत असताना पवार यांनी राष्ट्रवादीची वेगळी ओळखही कायम ठेवली. काही दिवसांपूर्वी पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवतील, असे जाहीर केले होते. 
महाराष्ट्रात डेंग्यू पसरल्याने ही मोहीम 
राबविणो आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. शुक्रवारी आम्ही स्वच्छता मोहीम सुरू करून रस्ते 
स्वच्छ केले आहेत. त्याची छायाचित्रेही घेतली आहेत. पण उद्या रस्त्यावर कचरा दिसता कामा नये, असे त्यांनी बारामतीत कार्यकत्र्याना बजावल़े (प्रतिनिधी)
 
नरेंद्र मोदींकडून स्तुती
शरद पवारजी यांचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. त्यांच्या सहकार्याने स्वच्छ भारत योजनेंतर्गत देश स्वच्छ करण्यास मदत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि¦टरवर म्हटले आहे. 

 

Web Title: Sharad Pawar's broom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.