शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar : मला विचार करायला दोन-तीन दिवस द्या; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पाठवला निरोप, एक अटही घातली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:07 IST

NCP Ajit Pawar : व्हाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच काही कार्यकर्ते उपोषणाला बसले. यानंतर आता अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. 

लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अचानक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. काही वेळाने शरद पवार निवासस्थानी गेले. यानंतर व्हाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच काही कार्यकर्ते उपोषणाला बसले. यानंतर आता अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. 

"तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर विचार करायला दोन ते तीन दिवस द्या" असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निरोप दिला आहे. "आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी आले होते. असं काही होईल हा सर्वांसाठीच शॉक होता. कार्यक्रमानंतर आम्ही सर्वजण सिल्व्हर ओकला गेलो. तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर विचार करायला दोन ते तीन दिवस द्या असं शरद पवारांनी म्हटलं आहे. माझ्यावर अवलंबून असतील तर माझं ऐकलंच पाहिजे असा पवार साहेबांचा निरोप आहे. हट्टीपणा बरोबर नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी जावं" असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

"आज ११ वाजता आपला जो कार्यक्रम होता. साहेबांच्या प्रेमाखातर आले होते. कुणाच्याच लक्षात आलं नाही की असं काहीतरी पवारसाहेब बोलतील, तो शॉक होता... बराच वेळ आपल्या सहवासात थांबले. सिल्व्हर ओकला गेले. विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, भुजबळ, वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड सिल्व्हर ओकला गेले. सगळ्या महाराष्ट्राची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे."

"मला, रोहितला, भुजबळांना सांगितलं - सुप्रियांशी फोनवर बोलले की, मी माझा निर्णय दिला आहे. विचार करायला दोन ते दिवस लागतील... तेवढे द्या.... कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जायचं... हट्टीपणा करताना कार्यकर्ता दिसला नाही पाहिजे.. बसलेला दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे राजीनामासत्र सुरू झालंय, ते थांबवलं गेलं पाहिजे. कुणीही राजीनामा देण्याचं कारण नाही."

"देशातून, राज्यातून फोन येत आहेत.. या सगळ्याचा विचार करण्याकरता दोन-तीन दिवस लागतील. भावनिक बोलले, अश्रू अनावर झाले, सगळ्यांनी आपापली भावना मांडली. या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतलेल्या आहेत. वडीलधाऱ्यांचं जसं ऐकतो तसं पवार साहेबांचं ऐका..." असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस