घरभेद्यांना पक्षातून हाकला - शरद पवार
By Admin | Updated: November 30, 2014 01:45 IST2014-11-30T01:45:41+5:302014-11-30T01:45:41+5:30
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्याविरुद्ध कारवाया केल्या. आमच्या पराभवात या घरभेद्यांचा मोठा वाटा होता,
घरभेद्यांना पक्षातून हाकला - शरद पवार
मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्याविरुद्ध कारवाया केल्या. आमच्या पराभवात या घरभेद्यांचा मोठा वाटा होता, अशा तक्रारी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांनी केल्यानंतर अशा घरभेद्यांच्या याद्या तयार करा, त्यांना पक्षातून हाकलून द्या, असा आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
राष्ट्रवादी भवनात शनिवारी विदर्भातील गडचिरोली वगळता दहा जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी निवडणुकीत पक्षाच्याच मंडळींकडून कसा दगाफटका झाला, याचा पाढा अनेक पराभूत उमेदवारांनी वाचला. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकत्र्याचे गाव्हाणो ऐकूण घेतल्यानंतर अशा घरभेद्यांची यादीच तयार करण्यास सांगितले.
असे लोक पक्षात राहिले काय किंवा नाही राहिले काय काहीही फरक पडत नाही. अशांना बाहेरचा रस्ता दाखविलेलाच बरा, अशी संतप्त प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केल्याचे सूत्रंनी सांगितले. नागपूर, बुलडाणा, कोल्हापूर, पुणो, भंडारा, सांगली जिलतून सर्वाधिक तक्रारी होत्या, असे समजते.
पवार यांनी यावेळी पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रय} करीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी करा, लोकांमध्ये जा, संवाद वाढवा असा सल्ला दिला. थोडय़ा फरकाने हरलेल्या उमेदवारांची त्यांनी विशेष आस्थेने विचारपूस केली. (विशेष प्रतिनिधी)