शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: "तुम्ही लाख ठरवलं पण आम्ही काय येऊन देतो का?", पवारांकडून फडणवीसांच्या जखमेवर मीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:56 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

उस्मानाबाद-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (Sharad Pawar) पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर असताना केलेल्या भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. 'मी पुन्हा येईन' या वक्तव्यावरुन शरद पवारांनी फडणवीसांना टोले लगावले. तसंच राज्याचा कारभार फार उत्तम पद्धतीनं चालला असल्याचंही ते म्हणाले. 

"संकट काळात राजकारण करायचं नसतं. काही लोकांना ते जमत नाही. ते कुठेही राजकारण करतात. निवडणूक लागायच्या आधीच, निकाल लागायच्या आधीच मी पुन्हा येईन असं सांगत फिरत होते. पण आम्ही येऊ देतो का?", असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांच्या जखमेवर मीठ चोळलं. तुम्ही पुन्हा येणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतलेली आहे. ही आघाडी आता यशस्वी झाली आहे आणि उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे, असं शरद पवार म्हणाले. 

राज्यपालांवरही साधला निशाणाशरद पवार यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही नाव न घेता निशाणा साधला. "कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी सोडून द्या म्हणतो", असं शरद पवार म्हणाले. राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श ठेवायला हवा हे ठरवायला हवं. ज्या छत्रपतींचा उल्लेख आपण केला त्या शिवछत्रपतींचं आयुष्य जिजाऊंनी घडवलं. कर्तृत्त्वाचा वसा पुरुषांनी नव्हे, तर स्त्रियांनी जपला. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानगंगा पोहोचविण्याचं काम केलं आहे, असं पवार म्हणाले. 

जनतेनं मला एक दिवसही सुट्टी दिली नाही"देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. लोकांच्या भविष्याचा विचार करायची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. ४ वेळा मुख्यमंत्री, ५२ वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे", असं शरद पवार म्हणाले. "कोणाला सांगताय म्हतारा झालोय जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही", असंही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस