शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शरद पवारांची चाणाक्ष खेळी: राज्यसभेसाठी मविआकडून श्रीमंत शाहू छत्रपतींना मैदानात उतरवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 19:23 IST

शाहू छत्रपतींच्या नावासाठी शरद पवार आग्रही असल्याने मविआकडून याबाबत काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar Rajya Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर आता राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेतेही पक्षांतर करू लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज  भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या पक्षांतरामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची चर्चा रंगू लागली आहे. अशातच काही दिवसांनी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवरही याचा परिणाम होऊ शकते. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार क्रॉस वोटिंग करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचं नाव सुचवल्याचे समजते.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही ही जागा जिंकण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या मतांची गरज भासणार आहे. अशा स्थितीत शाहू छत्रपती यांना उमेदवारी देऊन विजयश्री खेचून आणता येऊ शकते, असा प्रस्ताव शरद पवार यांच्याकडून मविआ नेत्यांसमोर मांडला गेल्याची माहिती आहे. शाहू छत्रपतींच्या नावासाठी शरद पवार आग्रही असल्याने मविआकडून याबाबत काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजय राऊतांनीही सुचवलं होतं नाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शाहू छत्रपती यांचं नाव सुचवलं होतं. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं होतं की, "राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून ३० मते वेगळी आहेत, इतरही येतील," असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच या पोस्टमध्ये राऊत यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही टॅग केलं होतं.

दरम्यान, देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या या ५६ जागांपैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोणत्या जागेवर कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजपा : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०,  काँग्रेस : ४४, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७ 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSharad Pawarशरद पवारShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती