शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:51 IST

राज ठाकरे यांना युतीत येण्यास विरोध

जत : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जर २०१४ सालीच एनडीएसोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते. अजूनही शरद पवारांनी देश हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले, शरद पवार यांनी महाराष्ट्राचे नाव देशाच्या राजकारणात पुढे नेले आहे. राज्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेसोबत यावे. त्यांच्या पक्षाचे बहुतांशी आमदारदेखील सत्तेत जाण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने निर्णय घ्यायला हवा.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, रिपाइंचे नेते संजय कांबळे, जगन्नाथ ठोकळे, अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय एम. पाटील आदी उपस्थित होते.

रिपाइंला सत्तेत वाटा हवाएनडीएने मला केंद्रात संधी दिली असली तरी राज्यात माझ्या पक्षावर अन्याय होतोय, ही बाब खरी आहे. मागच्या बारा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी दिली नाही. महामंडळात संधी नाही; परंतु यावर आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी ठोस चर्चा सुरू आहे. येत्या स्थानिक स्वराज संस्था, महापालिका, नगरपालिका येथे आम्हाला जागा हव्या आहेत. जर नाही मिळाल्या तर आम्ही जिथे आमची ताकद आहे, तिथे स्वबळावर लढू. सांगली जिल्हा नियोजन समितीसाठी आम्ही दोन नावे दिली आहेत. महामंडळावरच्या काही नियुक्त्यांसाठीही नावे दिली आहेत.राज ठाकरे यांना युतीत येण्यास विरोधराज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे. भलेही ते दोघे एकत्र आले तरी मुंबई महापालिका आणि राज्यात त्यांच्या युतीचा कसलाही परिणाम होणार नाही. लोकसभेला भाजपने राज यांना सोबत घेतले होते; परंतु त्यांचा फायदा एनडीएला झालेला नाही. शिवाय राज ठाकरे यांना तर महायुतीत येण्यास माझ्या पक्षाचा कायमच विरोध असून, तो आजही कायम आहे.