शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

राजकारणातून संवाद हरवला; कोणीही उठतो अन् कोथळा काढण्याची भाषा करतो - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 06:48 IST

मृणालताईंसारख्या लढाऊ व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळक ठसा आहे. त्यांचे कार्य केवळ सामान्य नागरिक नव्हे, तर राजकारण्यांसाठी दिशादर्शक आहे, असेही पवार म्हणाले.

मुंबई : हल्ली राजकारणात संवाद हरवत चालला आहे. कोणीही उठतो आणि कोथळा काढण्याची भाषा करतो. संवादाची परिभाषा बदलत चालली आहे. त्यात बदल घडविण्यासाठी मृणाल गोरे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श समाजापुढे मांडला पाहिजे, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. (Sharad Pawar says communication Lost from politics)

गोरेगावमधील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये ‘मृणालताई गोरे दालना’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मृणालताईंच्या आठवणींना उजाळा दिला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आदी यावेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, मंत्री म्हणून मला अनेकदा मृणालताईंच्या आंदोलनाचा सामना करावा लागला. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणले. महागाईविरोधात आंदोलन करत त्यांनी सरकारला घेरले होते. त्यावेळी मी गृह राज्यमंत्री होतो. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाऊसाहेब वर्तक यांच्याकडचे अन्न व नागरी पुरवठा खाते माझ्याकडे दिले. भुकेचा प्रश्न महत्त्वाचाच होता. अनेकदा त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मृणालताई, अहिल्याताई यांनी उपस्थित केलेले मुद्दे खरे होते. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. संवादातून ही कोंडी फुटत गेली. आता मात्र राजकारणात परिस्थिती वेगळी आहे.

मृणालताईंसारख्या लढाऊ व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळक ठसा आहे. त्यांचे कार्य केवळ सामान्य नागरिक नव्हे, तर राजकारण्यांसाठी दिशादर्शक आहे, असेही पवार म्हणाले.

आईची ममता...मृणालताईंची लोकांच्या प्रश्नांवर जी तळमळ होती त्यात आईची ममता होती असे सांगत बाबा आढाव यांनी अध्यक्षीय भाषणात मृणालताईंच्या कार्याला उजाळा दिला.

शिवसेनाप्रमुखांनी काम शिकण्याचा दिला होता आदेश- मृणालताई आदर्श राजकारणी होत्या. महाराष्ट्रभर फिरून माहिती घेत विधानसभेत त्या सरकारला धारेवर धरायच्या. - काम कसे करावे हे त्यांच्याकडून शिका, असे आदेश आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. - मृणालताईंच्या नावाने उड्डाणपूल असावा यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असे सांगत सुभाष देसाई म्हणाले की, राज्यात  मृणालताईंच्या नावाने एक आदर्श केंद्र उभे करण्याचा संकल्प आपण करुया.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस