शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:10 IST

MVA BMC Election: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले असून, मविआ एकत्र लढणार की नाही, याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. 

BMC Election Sharad Pawar: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेली मुंबई महापालिका यावेळी कुणाकडे जाणार, याबद्दल उत्सुकता आहे. दुसरी बाब म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र? हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याचीही चर्चा सुरू आहे. याचसंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विविध मु्द्द्यांवर भाष्य केले. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल काय निर्णय झाला आहे? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. 

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था मविआ एकत्र लढवणार का?

शरद पवार म्हणाले, "निर्णय काही घेतलेला नाही. आमचा अंदाज असा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्या निकालानुसार निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. आमचा प्रयत्न आहे, निर्णय अद्याप नाही. कारण आम्ही अजून चर्चा केलेली नाही."

वाचा >>"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

"काँग्रेस आहे, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोटे पक्ष आहे. आम्ही एकत्र बसू. एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का, याचा विचार करू. त्याचा अंतिम निर्णय करू. एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे", असे शरद पवार म्हणाले. 

मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र की स्वबळावर?

मुंबईत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार की, मुंबई वगळून एकत्र लढणार? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, "अजून काही चर्चा झालेली नाही. पण, मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्या मध्ये अधिक शक्तीस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागेल", असे शरद पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना सांगितले. 

टॅग्स :BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२५Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका