शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
2
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
3
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पाडला बांगलादेशचा बुक्का! ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
4
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
5
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
6
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
7
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
8
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
9
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
10
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
11
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
12
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
13
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
14
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
15
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
16
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
17
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
18
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
19
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
20
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."

"जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे"; सरकारी योजनांचा उल्लेख करत शरद पवारांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 20:24 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं म्हटलं आहे.

Sharad Pawar on Census : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटलं आहे. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. मराठा आंदोलकांनीही राजकीय नेत्यांना त्यांची आरक्षणाबाबती भूमिका नेमकी काय आहे असं विचारण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं म्हटलं आहे.

जोपर्यंत संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकारसमोर प्रश्न मांडता येणार नसल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. सोलापुरात एका मेळाव्यासाठी शरद पवार आले होते. मात्र त्याआधी शरद पवार यांची गाडी अडवण्यात आली होती. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हे विधान केलं आहे.

"जनगणना केल्याचा आग्रह करण्यात येत आहे. शेवटी तो समाज नक्की किती आहे, कोणत्या गावात आहे, त्यांची आकडेवारी काय ही सगळी सरकारच्या समोर येत नाही तोपर्यंत सरकारी योजनांचा लाभ किती टक्क्यांपर्यंत द्यायचा यासंदर्भातील निर्णय होऊ शकत नाही. त्यासाठी जनगणना ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एकदा किती लोक आहेत, किती कुटुंबे आहेत हे स्पष्ट होऊद्या. ती संख्या कळल्यानंतर त्या प्रमाणामध्ये त्यांच्या उन्नतीसाठी सरकारने आर्थिक तरतूद करावी आणि सवलती द्याव्यात. त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  

शरद पवारांची यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली

मराठा आरक्षणप्रश्नावरुन शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.  सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांना अगोदर कुर्डूवाडीजवळ मराठा आंदोलकांनी अडवले. तसेच शरद पवार यांच्याकडे मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पवार यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यानंतर बार्शीतल्या शेतकरी संवाद मेळाव्यातही पवार हे भाषण करत असताना आंदोलकांकडून पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारreservationआरक्षणSolapurसोलापूर