शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या 'या' दोन अटी अमान्य केल्याने सरकार स्थापण्याची भाजपची संधी हुकली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 12:59 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत जाण्यास तयारी होता, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजप नेतृत्वाने नकार दिला असून सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त 'नवभारत टाईम्स' या हिंदी पोर्टलने दिले आहे. 

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यामध्ये केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपने नकार दिला. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सरकारच्या मोबदल्यात कृषीमंत्रालय दिल्यास, बिहारमध्येही अशी मागणी होऊ शकते. बिहारमध्ये भाजप नितीश कुमार यांच्या जदयूमुळे सत्तेत आहे. नितीश यांच्याकडूनही रेल्वे मंत्रालयाची मागणी होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. 

राज्यात मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार चालवले होते. त्यामुळे नेतृत्व बदल करण्याच्या मूडमध्ये मोदी-शाह नव्हते. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळे फडणवीसांना बदलने शक्य नव्हते, असंही सुत्रांनी सांगितले.