शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

तब्बल ४० वर्षांनी शरद पवार रायगडावर; पक्षाच्या तुतारी चिन्हाचं केलं अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 11:37 IST

संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

रायगड - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं नवं नाव आणि चिन्ह बहाल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. पक्षाच्या या नवीन चिन्हाचं अनावरण शरद पवार गटान रायगड किल्ल्यावर केले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते. 

रायगड किल्ल्यावर पक्षाच्या अनावरण चिन्हासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. त्याठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण करण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया असं त्यांनी म्हटलं. 

तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र किल्ल्यावर पक्षाच्या चिन्हाचे अनावरण होतंय. ही तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात स्वाभिमानाचं प्रतिक बनलीय. महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद पवारांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. 

दरम्यान, तुतारी हे वाद्य आक्रमक सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा वाजवलं जाते आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हादेखील तुतारी वाजवली जाते. निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना ८४ वर्षाच्या आमच्या योद्धाला तुतारी हातात देऊन शुभ संकेत निवडणूक आयोगाने दिलेत. या लढाईत तुतारी वाजलेली आहे. विचारांची लढाई आम्ही जिंकू म्हणजे जिंकू असा विश्वास जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस