शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शरद पवार - नारायण राणे भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:14 IST

देशाच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून देणारे, राजकारणातील ‘जाणते राजा’ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भेट दिली.

सिंधुुदुर्ग : देशाच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून देणारे, राजकारणातील ‘जाणते राजा’ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भेट दिली. २० मिनिटे राणेंच्या निवासस्थानी आमदार नीतेश राणे व स्वाभिमानच्या प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत त्यांची महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याचा नेमका तपशिल समजू शकलेला नाही.

शरद पवार हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग दौ-यावर त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींसमवेत आले होते. या दौ-यात त्यांच्यासमवेत नातू रोहित, पार्थ, हर्ष पवार हे उपस्थित होते. सोमवारी रत्नागिरी येथे जात असताना त्यांनी कणकवली येथे भेट दिली. तसेच, नारायण राणे यांच्या ओम गणेश या निवासस्थानी ते दुपारी दाखल झाले. यावेळी  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम राणेंच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी शरद पवारांचे राणे कुटुंबीयांनी स्वागत केले. 

यावेळी  आमदार नीतेश राणे यांच्यासह  नीलमताई राणे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, विकास कुडाळकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, उपसभापती सुचिता दळवी,  माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, प्रदेश चिटणीस व्हिक्टर डान्टस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.माझी ही सदिच्छा भेट !मी सिंधुदुर्गात आलो होतो. नारायण राणे यांनी मला दूरध्वनी  केला होता. त्यामुळे मुंबईला जाता जाता त्यांच्या निवासस्थानी मी सदिच्छा भेट दिली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. कारण तशी चर्चा करण्यासारखा विषय माझ्याकडेही आणि राणेंकडेही नाही. त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेटच होती, अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे  पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.राणेंना भेटल्याशिवाय कोणीही कोकण सोडू शकत नाही !कोकणात राणेंची ताकद संपली, अशी विरोधक टीका करतात. परंतु महाराष्ट्राचे राजकारण नारायण राणेंशिवाय होऊ शकत नाही. कोकणात आलेला प्रत्येक दिग्गज नेता, मुख्यमंत्री असो किंवा अन्य मंत्री हे राणेंना निवासस्थानी भेटतात.  राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. तरीदेखील राणेंची राजकीय ताकद लक्षात घेऊन त्यांनी भेट दिली. त्यामुळे विरोधकांनी आमच्या राजकीय ताकदीची विचारणा करण्याअगोदर विचार करावा. कोकणात आलेला राजकीय नेता नारायण राणेंना भेटल्याशिवाय कोकण सोडू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या भेटीवर आमदार नीतेश राणे यांनी दिली.ग्रेट भेटीची उत्सुकता !नारायण राणे आणि शरद पवार यांची झालेली ही भेट आगामी काळात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे एनडीएत असलेला स्वाभिमान पक्ष भविष्यात महाआघाडीत दाखल होण्याच्या दृष्टीने ही साखरपेरणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विश्वास यात्रेतदेखील स्वाभिमान पक्षाध्यक्ष नारायण राणे यांनी  केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीकेची झोड उठविली होती.  त्यामुळे आगामी राजकीय आखाड्यांची बांधणी करण्याच्या दृष्टीनेच राणे-पवार यांची ही भेट झाली आहे, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. मात्र, या भेटीचा नेमका तपशील समजू शकलेला नसल्याने या ‘ग्रेट भेटी’च्या कारणाची उत्सुकता सगळ्यानाच आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग